१७ सप्टेंबर चालक दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे परीपत्रक ; क्रांती वाहक चालक मालक संघर्ष महासंघ कंधार शाखेने आदर्श चालकांचा सत्कार करुन केला साजरा

कंधार ; प्रतिनिधी

येथील क्रांती वाहन चालक, मालक संघर्ष महासंघ, कंधारच्या वतीने शुक्रवारी १७ सप्टेंबर रोजी जि.प.के. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वाहन चालक दिन साजरा करण्यात आला तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते आदर्श वाहन चालकांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी पोलीस निरीक्षक अवधूत कुशे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार राजेश्वर कांबळे, मुरलीधर थोटे, सय्यद हबीब, शेख शादुल, विठ्ठल कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार राजेश्वर कांबळे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान
करण्यात आला.

त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक अवधूत खुसे यांच्या हस्ते ११७ खासगी वाहन चालकांचा सत्कार करण्यात आला.

शासनाने दिनांक १७ सप्टेंम्बर चालक दिन साजराकरणे बाबत जे आदेश काढला त्याबद्दल माहीती दिली.

देशातील दळणवळण व परिवहन क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा घटक बालक असून त्याची अन्यन्यसाधारण भूमिका आहे. देशाच्या विकासामध्ये महत्वपुर्ण योगदानाबाबत चालक या घटकाचे गुणगौरव करण्याच्या दृष्टिीने दरवर्षी १७ संम्टेम्बर हा चालक दिन घोषित करण्यात आला आहे. दिनांक १७ सप्टेम्बर २०२१ रोजीच्या चालक दिनांच्या अनुषंगाने मोटार मालक कामगार वाहतुक संघटना, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी महाराष्ट्र राज्यात चालक दिन साजरा करण्याबाबत पत्राद्वारे विनंती केलेली आहे.

सदर पत्राच्या अनुषंगाने चालक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातील कार्यरत सर्व शहर वाहतुक शाखा व जिल्हा वाहतुक शाखा, तसेच महामार्ग पोलीस यांनी दिनांक १७ सप्टेंबर रोजी मोटार मालक कामगार वाहतुक संघटना, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचेशी समन्वय साधून आपल्या कार्यक्षेत्रात सर्व वाहन चालकांना शुभेच्छा व पुष्प देवून चालक दिन माजरा करावा असे या नविन जीआर मध्ये नमुद केल्याची माहीती देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांती वाहन चालक, मालक संघर्ष महासंघाचे तालुकाध्यक्ष माधव कांबळे यांनी केले. तर आभार उपाध्यक्ष सय्यद एकबाल यांनी मानले. यावेळी शेख सादात, श्याम बुरफुले, कृष्णकांत शेंडगे, व्यंकट मोरे, चंद्रकांत जाधव, शेख मन्सूर आदींसह खासगी वाहन चालक, मालक व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *