अखेर.. कंधार नगरपालीकेच्या स्वच्छता कामगारांच्या साखळी उपोषणाला यश..! सातव्या दिवशी कामगारांचे झाले वेतन.

कंधार ; प्रतिनीधी

कंधार नगर पालीकेच्या स्वच्छता रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेतन मिळत नसल्याने या कामगारांनी माजी सैनिक संघटनेकडे धाव घेतली होती.१३ सप्टेंबर रोजी सुरु झालेले उपोषण सात दिवस चाललेले उपोषण माजी सैनिक संघटनेच्या पुढाकाराने मागण्या मान्य झाल्यावरच १६ सप्टेंबर रोजी उपोषण उठले.

१३ ऑगस्ट रोजी माजी सैनीकांच्या पाठिंब्यावर स्वच्छता कामगार नगर पालिका प्रशासनाच्या विरोधात उपोषला बसले त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आर्धे वेतन दिले होते व उर्वरीत देण्याचे अश्वासन दिले होते.परंतु या अश्वासनाला गुत्तेदार व बगल देत असल्याने 13 सप्टेबंर रोजी पुन्हा हे कामगार उपोषणला बसले .

माजी सैनिक संघटनेच्या आक्रमक पवित्रामुळे हे कामगारांचे साखळी उपोषण चांगलेच गाजले .अखेर या उपोषणाला यश आले असुन उर्वरित वेतन करुन सातव्या दिवशी दिनांक 16 सप्टेबंर रोजी रात्री दिडच्या सुमारास हे उपोषण उठवण्यात आले.

गुत्तेदाराच्या चुकीमुळे या कामगाराच्या मानधनात घोळ निर्माण झाला होता.माजी सैनिक संघटनेने यात सहभाग घेतल्याने या साखळी उपोषणाला वेगळेच वळण लागले .उर्वरित वेतन मिळण्यासाठी हे कामगार साखळी उपोषणला बसले खरे परंतु सत्ताधारी व माजी सैनिक संघटनेच्या पदधिकारी यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता.त्यामुळे कोन्हीच माघार घेत नसल्याने हे साखळी उपोषण सात दिवस चालुच राहीले.

17सप्टेबंर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असल्याने नगर पालीकेच्या वतिने उपोषण कृत्यावर गुन्हे दाखल करण्याची नोटीस काढण्यात आली होती.त्यामुळे हे उपोषण चिघळणार असल्याचे दिसत होते.

नगर पालीका प्रशासनाच्या वतिने एक पाऊल मागे घेऊन 16सप्टेबंर रोजी रात्री दिड वाजता या कामगारांचे उर्वरित वेतन देऊन हे उपोषण उठवण्यात आले. यावेळी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकुलवाड यांनी नगर पालीका प्रशासनाचे अभिनंदन केले असुन आमचा कोणताही राजकीय उदेश नसुन हा लढा कामगारांच्या न्याय हक्कासाठी होता.या उपोषणाला आलेले यश हे लोकशाही व कामगाराच्या एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया बालाजी चुकुलवाड यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *