कंधार ; प्रतिनिधी
ग्रामीण रुग्णालय कंधारच्या वतीने आयोजित महालसीकरण सोहळ्यात कंधार शहरात एका दिवसात ८०४ नागरीकांना कोव्हीड १९ प्रतिबंधक लस दिली असल्याची माहीती रविवार दि.१९ सप्टेंबर रोजी वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी विपीन ईटनकर व जिल्हा शल्यचिकित्सक निळकंठ भोसीकर यांच्या आदेशानुसार 17 सप्टेंबर 2021 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी हा महालसीकरण मोहीम ग्रामीण रुग्णालय कंधार यांच्या वतीने यशस्वीरित्या राबविण्यात आले .
कंधार शहरातील सर्व वॉर्ड नुसार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुर्यकांत आर. लोणीकर यांनी नियोजन करुन लसीकरण मोहिमेस सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दहा टीम नेमून दिले त्यानुसार प्रत्येक अधिकारी व कर्मचारी लसीकरण बाबत माहीती यंत्रणेला पुरवित होते.
तसेच ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी आणि नगरपरिषद येथील सर्व कर्मचारी यांना बुथनिहाय दारोदारी जाऊन नागरिकांना त्यांच्या घरी भेट देऊन लस घेण्यास प्रवृत्त केले.
त्यात सर्व वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारीका, औषध निर्माण अधिकारी ,आरोग्य सेविका, डेटा एन्ट्री ऑपरेटर यांचा सक्रीय सहभाग होता.