कंधार/प्रतिनिधी
माजी आमदार व माजी खा.जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या शतकोत्सव वर्षानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.दि २१ सप्टेंबर रोजी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थेचे सचिव माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुरुडे यांच्या मार्गदर्शनातून संस्थेचे अध्यक्ष, प्रा.डॉ.पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीस “एक लाख रुपयांचा” धनादेश धर्मादाय उपआयुक्तचे अधिकारी किशोर मसने यांच्याकडे प्रदान केला.
अतिवृष्टीमुळे या भागातील मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अस्मानी संकट ठरले आहे.या संकटामध्ये आपल्या भागातील गरीब शेतकरी,कष्टकरी बांधवांचे शेतसाहित उभे पीकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशा संकटसमयी केवळ धीर देऊन पाठीशी उभे न राहता संस्थेच्यावतीने “एक लाख रुपयांचा धनादेश” मुख्यमंत्री सहायता निधीस देऊन आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. हा निधी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे यांनी धर्मादाय उपायुक्त किशोरजी मसने यांच्याकडे प्रदान करून पुन्हा सिद्ध केले की, “जिथे कमी तिथे आम्ही”.
या परिवाराने यापूर्वीसुद्धा कोरोनाच्या संकटकाळी परिसरातील डॉक्टर,नर्स,कामगारांना आपल्या सांस्थेच्या वतीने पीपीई किटचे वाटप केलं होत.इतकंच नाही तर दोन्ही तालुक्यातील या महामारीत ज्यांचं पालकत्व गेलं अशा मुलामुलींचे पालकत्व शिवकारलं. लोहा व कंधार तालुक्यातील सर्व खासगी रुग्णालय,सरकारी रुग्णालय सर्व डॉक्टर्सना,नर्स,अंबुलन्स ड्रायव्हर्स, पॅथॉलॉजी कर्मचारी यांच्या संपर्कात राहून जिथे गरज असल्यास मोट्या ताकतीने या परिवाराने कोरोना काळात मोठी आर्थिक मदत केलेली आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला व “भाऊचा डबा” ज्या वेळेस कोरोनाकाळात कोरोना रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या जवळ जाण्यास कुणी तयार नव्हते त्या काळामध्ये संस्थेच्या वतीने भाऊचा डबा माध्यमातून रुचकर आणि स्वादिष्ट जेवण त्यांना देण्याचे काम संस्थेच्या वतीने करण्यात आले. आज जरी पेशंट कमी झाले तरी ” भाऊचा डबा” दोन्ही तालुक्यात दररोज चालू आहे.गोरगरीब जनतेचा आशीर्वाद हि मोठी देण असल्याच्या प्रतिकीया या परिवाराने पूर्वीपासून दिली दिली आहे. “भाऊचा डबा” हा त्या ठिकाणी आजतागायत दिला जातो. अशा पद्धतीने आपली सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी विविध उपक्रम संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे हे राबवत आहेत.या कार्याचे कौतुक समाजातील सर्व स्तरातून होत आहे.