कंधार :- हनमंत मुसळे
राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन तालुका सेवा समिती कंधार तर्फे करण्यात आले होते. त्यात दिवाणी व फौजदारी स्वरुपाचे 38 केसेस आणि दाखल पुर्व 290 प्रकरण असे एकुण 328 प्रकरणे समोपचाराने निकाली काढण्यात आली व 96,16,661/- रुपयाची वसुली करण्यात आली आहे.
दि. 25/09/2021 रोजी शनिवारी सकाळी 10:30 वाजता जिल्हा अतिरिक्त सञ न्यायालय कंधार येथे ए. एस. सलगर (जिल्हा न्यायाधिश) मार्गदर्शनाखाली कंधार तालुका विधी सेवा समितीच्या वतीने राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोक न्यायालयात कंधार न्यायालयातील दिवाणी व फौजदारी स्वरुपाचे 38 प्रकरण निकाली काढुण 47,23,472/- रुपयाची वसुली व दाखल पुर्व 290 प्रकरण निकाली काढुन 47,93,189/- रुपयाची वसुली अशी एकुण 96,16,661/- रुपयाची वसुली प्रलंबित प्रकरणात करण्यात आली आली आहे. व समोपचाराने प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या राष्ट्रीय लोक न्यायालयात दुरसंचार निगम विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक , स्टेट बँक आँफ इंडिया यांनी सहभाग घेतला अश्या लोक अदालतीमुळे प्रशासनाचा वेळ व आर्थिक बचत होत असते. व प्रशासन आणि जनतेत समनव्य टिकुन राहते व समोपचाराने प्रकरणे निकाली निघण्याची शक्यता असते प्रशासनाची वसुली मोठया प्रमाणात होईल.
राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी मा. ए. एस. सलगर (जिल्हा न्यायाधिश), मा.राऊत (दीवानी न्यायाधीश व.स्तर)मा. श्रीमती आर. ए. खतीम ( सह दिवानी न्यायाधिश कनिष्ठ स्तर), अँड. के. एस. अन्सारी ( अभिवक्ता संघाचे प्रभारी अध्यक्ष व कार्यकारी संघाचे उपाध्यक्ष) , सचिव अँड. सुधाकर मुसळे, अँड. बि. टी. राठोड, अँड. राहुल ढवळे, , अँड. , अँड. , अँड. एस. व्ही. सोनकांबळे, अँड. अभय देशपांडे, अँड. रवि केंद्रे, अँड. मुखेडकर, व कर्मचारी डावरे मँडम, एन. के. जाधव, वाडीकर, चव्हाण , दवणे, पाटील, आणि पंच म्हणुन महमद हमीदोद्दीन, हाणमंत मुसळे आदि सह जेष्ठ विधीतंज्ञ उपस्थित राहुन काम पाहिले आहेत.