नांदेड – येथील सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे यांच्या साहित्यविषयक व सामाजिक कार्याची दखल घेत मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान उमरीच्या वतीने वाघमारे यांना काव्यरत्न पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
यावेळी प्राचार्य जाधव ए.एस., भंते श्रद्धारख्खिता, एम.सायल्लू म्हैसेकर, नगरसेवक ईश्वर वि.सवई, रत्न खंदारे, सोनु वाघमारे, संरपच मारोती वाघमारे, उपसंरपच देविदास अक्कवाड, दता कोणगुलकर, चेअरमन मारोती उमाटे, प्रा. डॉ. गंगाधर तोगरे, पांडूरंग कोकुलवार, गंगाधर ढवळे, भारतीय बौद्ध महासभेचे उमरी तालुकाध्यक्ष भीमराव वाघमारे, सुदाम पलेवाड,भालेराव सा.ना., सरोदे बाबुराव, भीमराव वाघमारे, नागोराव जोंधळे, केरला पवार, सतिश झडते, गौतम कांबळे, छाया भालेराव, बाबुराव पाईकराव, नागोराव डोंगरे, कैलास धुतराज, मारोती कदम, शंकर गच्चे, रणजीत गोणारकर, छाया कांबळे, राजेश्वर कांबळे, परशुराम केंद्रे, बालिका बरगळ, डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार, सिंधुताई दहीफळे, दत्ताहरी कदम, पांडूरंग कोकुलवार, भैय्यासाहेब गोडबोले, चांगुणा गोणारकर,एन. सी. भंडारे आदींची उपस्थिती होती.
सामाजिक तथा धार्मिक योगदानाबद्दल आदिलाबाद ( तेलंगणा) येथे, आंबेडकरी साहित्यिक अनुरत्न वाघमारे यांना, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, प्रसिद्ध गझलकार मधु बावलकर व अ. भा. आंबेडकरी साहित्य व सस्कृंती संवर्धन महामंडळाचे अध्यक्ष व प्रसिद्ध विचारवंत मा. प्रशांत वंजारे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध विद्रोही भीम शाहीर साहेबराव येरेकर व सोबत शाहीर संभाजी गाढे हे उपस्थित होते.