मुंबई ; प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील मौ. गऊळ येथे उद्या ता. ३० रोजी ‘मानवहित’ लोकशाही पक्षाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या सूनबाई मा. सावित्रीमायी साठे आणि ‘मानवहित’ लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा पुनर्स्थापना आंदोलन करण्यात येणार होते. सदरील आंदोलनाची दखल घेऊन राज्यचे महसूल मंत्री तथा नांदेड जिल्हाचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी घेऊन ‘मानवहित लोकशाही पक्षाच्या’ शिष्टमंडळासोबत तातडीची बैठक आयोजित करून त्यात ‘मानवहित’ने मागणी केलेल्या सर्व मागण्यांवर प्रशासनाला कडक निर्देश देत ठोस निर्णय घेतल्यामुळे हजारोंच्या संख्येने उद्या होणारं आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सचिन भाऊ साठे यांनी काल दि. २८ रोजी मुंबईत केली.
गऊळ प्रकरणी बैठकीत झालेले निर्णय.
• मौजे. गऊळ येथे प्रशस्त सभागृह, अभ्यासिकावजा सुसज्ज ग्रंथालय आणि अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा ही तिनही कामं संयुक्तरित्या निर्धारित वेळेत केले जातील.
•गऊळ प्रकरणी गावात आणि वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील.
• महिला आणि पुरूषांवर झालेल्या लाठीचार्जची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
• मौ. गऊळ येथे सभागृह, ग्रंथालय आणि पुतळा उभारणीसाठी सध्या ७ लक्ष रूपयाचा निधी वितरीत करण्यात आला असून सदर निधी अपुरा पडत असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिल्यानंतर डी पी डी.सीतून १० लक्ष रू पर्यंतच्या निधीची तरतूद करण्याचे निर्देश मा. जिल्हाधिकारी यांना बैठकीतून दिले.
• प्रत्यक्ष कामाला आज पासून सुरूवात.
• नांदेड आणि महाराष्ट्रात मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारांमध्ये जातीने लक्ष घालणार असल्याचं पालकमंत्री यांचं आश्वासन.
• सभागृह, ग्रंथालय आणि अण्णा भाऊं साठे यांच्या पुतळा अनावरणासाठी मा. सावित्रीमायी साठे आणि सचिन भाऊ साठे यांना पालकमंत्र्याडून कालच निमंत्रण.
सदरील बैठक मा. ना. अशोकाराव चव्हाण यांच्या मलबार हिल येथील ‘मेघदूत ‘ या निवास्थानी पार पडली. जवळपास एक तास चाललेल्या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सचिन भाऊ साठे, राज्याचे माजी गृहमंत्री मा. रमेश दादा बागवे, मानवहित लोकशाही पक्षाचे कोअर कमीटीेचे अध्यक्ष तथा जेष्ठ विधिज्ञ मामा. अॅड. टी. एन. अण्णा कांबळे, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते मा. अंकल सोनवणे (पूणे) मानवहितचे राष्ट्रीय महासचिव मा. गणेश भाऊ भगत, प्रदेशाध्यक्ष कॉ. अशोक उफाडे, माजी अध्यक्ष राधाकृष्ण साठे, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष मा. बालाजी घुमाडे, रिपाई मातंग आघाडीचे अध्यक्ष मा. हनुमंत साठे, परभणी जिल्हाध्यक्ष कॉ. दत्ता तांबे, मानवहितचे ठाणे जिल्हाउपाध्यक्ष गजानन चावरे, मा. लोंढे , आदि मान्यवर मा. पालकमंत्री मोहदयाच्या निवास्थानी झालेल्या बैठकीत उपस्थित होते.!