मूखेड:- प्रतिनिधी
दि.२८ सलग दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे बा-हाळी देगलूर रोडवरील नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बा-हाळी येथून मौजे माकणीकडे जाणाऱ्या ऑटो मधील एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना दि.२८ सप्टेंबर रोजी रात्री ९ च्या दरम्यान घडली बा-हाळी परिसरात गत दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस चालूच असून यामुळे परिसरातील लहान मोठे सर्वच नदी नाले पूर्ण क्षमतेने वाहत आहेत.बा-हाळी देगलूर रोड वर असलेल्या कूंन्द्राळा नदीसही मोठा पूर दोन दिवसापासून आलेला आहे. त्यामुळे या रोडवरील पूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. याच नदीवरील पूल गेल्या पुरामध्ये पूर्णपणे उखडला गेला होता.
त्या पूलाची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. परंतु तीही या पुरामध्ये कुचकामी ठरले. बा-हाळी मार्ग एक ऑटो घेऊन माकणीकडे निघाले. ऑटो बा-हाळी जवळील कूंन्द्राळा नदिच्या पुलावरून ऑटोचालक नेहमीच या रस्त्यावरून ये-जा करत असल्याने त्याने ऑटो पुलावरून पुढे नेत असतानाच नेमका पूल खचलेल्या ठिकाणी येऊन ऑटो बंद पडला. त्यामुळे ऑटो हेलकावे खाऊ लागला त्याक्षणी पाठवत बसलेल्या पैकी गणपत माधव गवलवाड वय ३५ वर्षे हा तरुण ऑटोतून बाहेर पडत असतांना काही कळायच्या आतच तरुण प्रवाहामध्ये वाहत दिसेनासा झाला.
उर्वरित व्यक्ती एकमेकांना धीर देत एकमेकाचा हात धरून ऑटोसह किनाऱ्यावर आले. सर्वत्र अंधार असल्यामुळे उडी मारल्यानंतर त्या व्यक्तीचे नेमके काय झाले हे सोबतच्या व्यक्तींना नजरेस पडले नाही.मुक्रामाबाद पोलीस ठाण्याचे सपोनि संग्राम जाधव हे घटना समजताच केवळ अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल होऊन काही तरुणांच्या मदतीने नदीच्या दोन्ही किनाऱ्याने बॅटरीच्या उजेडात का होईना परंतु वाहून गेलेल्या तरुणांना शोधण्याचा शर्तीचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही सदरील तरुण जिवंत राहण्याची शक्यता बऱ्याच अंशी मावळ्याची भीती अनेकांनी व्यक्त केली आहे सदरील तरुणाची घरची परिस्थिती सर्वसाधारण असल्याने माकणी गावांमध्ये शोककळा पसरली आहे.