आमदार शामसुंदर शिंदे यांनी पेनुर मंडळातील पडझड झालेल्या पुलाची व बाधित शेतीची केली पाहणी

लोहा( प्रतिनिधी )


तालुक्यातील पांगरी ते पेनुर रस्त्यावरील अतिवृष्टी च्या पुरामुळे पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पडझड झाली असल्याने काल गुरुवारी लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी प्रत्यक्ष जाऊन नुकसान झालेल्या पुलाची पाहणी केली,.

यावेळी आमदार शिंदे यांनी या भागातील शेतीच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन केळी, ऊस, कापूस ,ज्वारी ,सोयाबीन, सह इतर पिकाची पाहणी करून आढावा घेतला , यावेळी खरेदी-विक्री संघाचे उपसभापती शाम अण्णा पवार, बोरगावचे सरपंच पुंडलिक पाटील बोरगावकर, माजी सरपंच गंगाधर पाटील गवते, मारोती एजगे सिद्धू पाटील वडजे, बाबाराव पाटील, राहुल बोरगावकर, पत्रकार विरभद्र ऐजगे, अशोक सोनकांबळे सह गावकरी उपस्थित होते.

यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी अतिवृष्टीच्या पाण्यामुळे केळी, ऊस, सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे पाहून आ. शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त करत शेतकऱ्यांना धीर दिला. लोहा, कंधार मतदार संघात अतिवृष्टीच्या पाण्यामुळे हातातोंडाशी आलेले खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांना कदापि वार्‍यावर सोडणार नसून मतदार संघातील शेतकऱ्यांना सरसकट भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी बोलताना सांगित.

यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी पेनुर येथील गोदावरी नदीच्या पूर परिस्थितीची पाहणी करून नदीकाठच्या नुकसान झालेल्या ऊस व केळी पिकांच्या शेतीची पाहणी केली यावेळी माधव गवते ,रावसाहेब गवते, सुरेश फरकंडा कर, मल्लिकार्जुन पांडागळे ,सुरेश गवते, भगवान चांदणे, बाबू गुरुजी ठोंबरे, शिवराज धोंडे, नारायण आव्हाड सह गावकरी ,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *