कंधार/प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यासह कंधार तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटी आणि सतत मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ लवकरात लवकर जाहीर करून सरसगट 50 हजार रुपये नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी आशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनाद्वारे तहसिलदार यांना आज गुरुवार दि.30 सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे.
या निवेदनाची दखल प्रशासनाने नाही घेतल्यास तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमुद करण्यात आले .
यावेळी बळीराम पाटील पवार मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष ,नितीन पाटील कोकाटे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष ,विकास लुंगारे संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष, धनंजय कौसल्ये , संभाजी गायकवाड, कृष्णा गोटमवाड, पांडुरंग जाधव , स्वप्निल पांचाळ, सौरभ लुंगारे ,रोहित फुलारी आदीसह संभाजी ब्रिगेड पदाधिकारी उपस्थित होते.