पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली पूरग्रस्तांची पाहणी..शेतकऱ्यांनी काळजी करू नका शासन तुमच्या पाठीशी – पालकमंत्री अशोकराव चव्हाण

मुदखेड ; ईश्वर पिन्नलवार

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड शहरात आगमन होताच थेट पूरग्रस्तांची पाहणी केली.

नांदेड जिल्ह्यात गेल्या चार पाच दिवसापासून सतत पावसाची हजेरी त्यात नदीनाले तुबंन वाहु होऊन गेले यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर पीकांचे नुकसान झाले यात तोंडाला आलेला घास पाण्यात बुडून गेला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मुंबई हुन तात्काळ विमानाने नांदेड ला आलेत थेट विमानतळावरून थेट अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव या भागात शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे असे मत पालकमंत्री हे महादेव पिंपळगाव अर्धापूर जवळ असलेल्या लोणी गावाला भेट दिली यामध्ये सोयाबीन हळद केळी ऊस यांच्यासह हंगामी पिकाची झालेल्या नुकसानाची तात्काळ पंचनामे करा अशा सूचना उपस्थित तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी अधिकारी तसेच समधीत प्रशासनाला दिल्या आहेत.

अर्धापूर तालुक्यातील लोण येथील दोन ठिकाणी शेतकऱ्यांना भेट घेऊन दिलासा दिला आहे.

सध्या नांदेड जिल्ह्यात देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक आचारसहिता असल्यामुळे जास्त वेळ न घेता पुढील शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करण्यासाठी अर्धापूर तालुक्यात पूर परिस्थितीची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या.

लाहन येथील शेतकऱ्यांच्या अडचणी आयकुन घेतले नंतर
आंबेगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले चौकात शेतकरी व महिला यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना पिक नुकसान तसेच पिक विमा तात्काळ देण्यात यावा अशी मागणी या भागातील शेतकरी ने केली आहे.

पिक विमा हा केंद्र सरकारचा विषय आहे.. पालकमंत्री
पिंपळगाव महादेव, लोणी लहाण. आंबेगाव, शेतकऱ्यांची भेट घेऊन पिक विमा हा केंद्र सरकारचा विषय आहे यात शेतकऱ्यांना याचा फायदा किती होईल बदल मी स्वता लक्ष देउन शेतकऱ्यांचा विम बदल अनेक तक्रारी पालकमंत्री यांना केले आहेत.

यावेळी आमदार मोहनराव हंबर्डे, पप्पु पाटील कोडेकर यांच्या सह बांधकाम विभागाचे अधिकारी, महसूल अधिकारी,मंडळ अधिकारी, तलाठी कृषी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *