तब्बल २५ वर्षानंतर भेट होताच काय म्हणतेय तुमची पत्रकारिता हे वाक्य कानावर पडलं , तेथून जुन्या शैक्षणिक व बालपणातील खट्याळखोर आठवणींना उजाळा देणाऱ्या गप्पांना सुरुवात झाली..
आज ज्यांची भेट झाली ते म्हणजे आमचे वर्गमित्र जे की दहावीपर्यंत कंधार येथील मनोविकास विद्यालय या शाळेत शिकले , आदरणीय गुट्टे सरांकडे गणित विषयाच्या टीवशनला पण आमच्या सोबतच होते .
तसा तो खूपच मितभाषी , शांत स्वभावाचा , संयमी , चाणाक्ष अगदी लहानपणापासून च अतिशय हुशार , कुशाग्र बुद्धी चा सरळ आणि मनसोक्त मैत्रीचा व मित्रांचा आनंद घेणारा व देणारा . म्हणतात ना लेकराचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे च तो भविष्याचा वेध घेत शिकला आणि स्वकर्तुत्वाने मेहनतीच्या , कौशल्याचे व जिद्दीच्या जोरावर आज एका उच्य पदावर तो कार्यरत असल्याचा आम्हा सर्व वर्गमित्रांना त्याचा सार्थ अभिमान आहे ..
तो नेमका कोण ? याची उत्सुकता नक्कीच तुम्हाला पण लागली असेलच..
अहो शिवराज धुप्पे हो ज्यांच शिक्षण मनोविकास विद्यालय कंधार येथे झालं तोच शिवराज धुप्पे IAS अधिकारी झाला.. एवढेच काय तर आजघडीला ते देशातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या व देशाच्या सर्वोच्य ठिकाणी महत्वपूर्ण कार्यालयात विशेष पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
ते सध्या भारत देशाचे विद्यमान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या सानिध्यात केंद्रीय डिफेन्स फायनान्स विभागात प्रमुख पदावर कार्यरत आहेत.
आज योगायोग ते त्यांच्या आजोळी चिखलभोसी या गावी आले होते , ही बातमी संतोष बोरगावे कडून कळताच मी , संतोष , कंधार-लोहा शिवसेना नेते ऍड मुक्तेश्वर धोंडगे , नामदेवराव पटणे , गजानन डांगे आम्ही सर्वजण मुद्दाम चिखलभोसी येथे गेलो आणि शिवराज धुप्पे ची सदिच्छा भेट घेतली. तेंव्हा त्यांच्या आजोळचे सर्व कुटुंबीय , अरुण पाटील हे सर्व उपस्थित होते.
भेटी दरम्यान मी म्हटलं साहेब तब्बल २५ वर्षांनंतर आपण भेटतोय तर मला ओळखलं का ? तेंव्हा त्यांच्या तोंडच वाक्य होत अरे अस कस बोरगावे , काय म्हणतेय तुमची पत्रकारिता... या एवढ्याच वाक्याने सर्वकाही जाणीव करून दिली आणि जाग झाले ते शैक्षणिक बालपण ... मग काय बराच वेळ निवांत मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यानंतर मी निघालो आपल्या मार्गाने .. पण रस्त्याने माझं मन मलाच बोलत होते शिवराज जसा पहिला मनमोकळा होता तसाच आजही असून अंगी असलेली नम्रता व शैक्षणिक विदवत्तेच्या जोरावर देशाच्या एवढ्या उच्च पदावर कार्यरत आहे तो माझा वर्गमित्रच याचा मलाही मनस्वी सार्थ अभिमानच वाटला..