सेवा ही संघटन उपक्रमाचे द्विशतक : दिलीप ठाकूर यांची सामाजिक कार्याची ऐतिहासिक कामगिरी

नांदेड .

सामाजिक उपक्रम काही नैमित्तिक साजरे केले जातात..त्याचा अनेकदा गवगवा केला जातो..पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला अनुसरून भाजपातर्फे सेवा ही संघटन या मोहिमे अंतर्गत सलग दोनशे दिवस नांदेड शहरातील श्री गुरू गोविंदसिंगजी स्मारक शासकीय लसीकरण केंद्रात भाजप जिल्हा सरचिटणीस
धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी लस घेणाऱ्या नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, बिस्किट व पाण्याची बॉटल देऊन भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारची ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

18 मार्च 2021 रोजी
खा.प्रतापराव पाटील चिखलीकर , महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली संयोजक दिलीप ठाकूर यांनी नांदेडमध्ये या उपक्रमाची सुरुवात केली होती. एकही दिवस खंड न पडता हा उपक्रम आजतागायत सुरू आहे. दोनशे दिवसात पंधरा हजारापेक्षा जास्त नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, बिस्किट व पाण्याची बॉटल वितरित करण्यात आले.

दररोज
हे साहित्य वितरण करण्यासाठी दिलीप ठाकूर यांच्या समवेत लायन्स क्लब नांदेड सेंट्रल चे सचिव अरुणकुमार काबरा, सहसचिव सुरेश शर्मा, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस सुरेश निलावार ,नवा मोंढा मंडळ सरचिटणीस कामाजी सरोदे,भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा संयोजक प्रशांत पळसकर, भाजपा हनुमान पेठ मंडळ उपाध्यक्ष राजेशसिंग ठाकूर यांनी अतिशय परिश्रम घेतले आहेत.

याशिवाय दिलीप ठाकूर हे कोरोना लॉकडाऊनच्या काळात गरजवंत लोकांना पोटभर जेवण व मदतीसाठी धावून गेले.या उपक्रम अंतर्गत राज्यात व देशात अविरत काम करण्याची नोंद दिलीपभाऊ यांच्या नावावर झाली आहे.निस्वार्थ हेतूने कोविड व कोविडेत्तर काळात लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या या उपक्रमाची वरिष्ठांनी नोंद घेतली.

धर्मभूषण दिलीपभाऊ ठाकूर यांची सामाजिक सेवा गरजवंतांसाठी खूपच मोलाची ठरली आहे.कोविड सारख्या जीवघेण्या काळात जेथे घरची माणसं जवळ यायला धजत नव्हती, अश्या काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “सेवा ही संघटन” हा उपक्रम राबविण्याचे कार्यकत्यांना आवाहन केले.नांदेड शहरात दिलीप ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्ण व नातेवाईक यांची जेवणाची व्यवस्था केली.तसेच शहरात भूमीवरी पडावे ,ताऱ्यांकडे पाहावे ” असे जीवन जगणाऱ्या भटक्याच्या..” नाही रे वाल्यांच्या ” पोटभर जेवनाची सोय केली. इतरांना अन्य वस्तूंची सेवा पुरविली.

तन मन धनाने चालविणारे
हे काम अविरतपणे दोनशे दिवस झाले सुरू आहे.सेवा ही संघटन याचे द्विशतक करणारे दिलीप ठाकूर यांनी चालविलेला हा उपक्रम देशात लक्ष्यवेधी ठरला. त्यांच्या या सेवावृत्तीमुळे अनेकांना मोठा आधार मिळाला आहे. एखाद्या उपक्रमाचे पहिल्यांदाच नाबाद द्विशतक केल्याबद्दल दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *