लोहयात शहिद संभाजी कदम यांच्या स्मरणार्थ अॉल इंडिया तंजिम-ए- इंसाफ संघटनेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


लोहा / प्रतिनिधी
लोहयात शहिद संभाजी कदम यांच्या स्मरणार्थ आॅल इंडिया तंजिम-ए-इंसाफ संघटनेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 55 रक्तदान झाले.


सामाजिक, आदी क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारे आॅल इंडिया तंजीम ए इंसाफ संघटनेचे लोहा तालुका प्रभारी निहाल अहमद मंसुरी हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात
लोहा तालुक्यातील मौजे जानापूरी येथील भूमीपुत्र भारतीय सैन्य दलातील जवान संभाजी कदम हे आपल्या भारत देशाचे रक्षण करताना शहिद झाले. त्यांच्या स्मरणार्थ लोहा येथे दि. ५-१०-२०२१ रोज मंगळवारी लोहा पोलीस स्टेशन समोर मुख्य रस्त्यावर आॉल इंडिया तंजिम-ए-इंसाफ संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन शहीद संभाजी कदम यांचे वडील यशवंतराव कदम व लोहा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी तंजिम-ए-इंसाफ संघटनेने जिल्हाध्यक्ष अब्दुल माजीद बशीर होते.
यावेळी या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन जवळपास 55 जणांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून रक्तदान केले.


यावेळी आॅल इंडीया तंजिम-ए-इंसाफ संघटनेने लोहा तालुका प्रभारी निहाल अहमद यांनी प्रथम स्वतः रक्तदान केले असल्यामुळे कार्यकर्त्यांत रक्तदान करण्यासाठी उत्साह पसरला.


यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आॅल इंडिया तंजिम-ए-इंसाफ संघटनेचे लोहा तालुकाध्यक्ष अन्सार खाॅन,ताजोदीन कुरेशी,चांद पटेल, अब्दुल रौफ,सदाम इब्राहीम,अजीस पठाण, यांच्या सह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


तसेच सदरील रक्तदान केलेल्यां रक्ताचे संकलन डॉ ‌.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *