कुरुळा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद


लसीकरणाकडे पाठ फिरवलेल्या नागरिकांनी आता जनजागृतीमुळे लसीकरण केंद्राकडे आपला मोर्चा वळवला आहे.नांदेड जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या मिशन कवच कुंडल अंतर्गत ग्रामीण भागात लस घेणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ होत असून कंधार तालुक्यातील कुरुळा परिसरात विक्रमी लसीकरण झाले आहे.

कुरुळा प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काही दिवसांपासून प्रयत्न करूनही नागरिकांनी कोव्हिड लसीकरण मोहिमेकडे पाठ फिरवली होती.परंतु नुकतेच ता.२१ रोजी मिशन कवच कुंडल अंतर्गत अखंड ७५ तासाची लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.या विशेष मोहिमेत शिक्षण विभाग,महसूल विभाग व आरोग्य विभागाच्या सहकार्यातून गावोगाव जनजागृती करण्यात आली.यास प्रतिसाद देत नागरिकांनी लसीकरण करण्याचा निर्णय घेत पहिल्याच दिवशी तब्बल ३६० दुसऱ्या दिवशी ६४२ तिसऱ्या दिवशी ता.२३ रोजी १०४७ एवढे विक्रमी लसीकरण झाले.ही नोंद तालुक्यात सर्वाधिक ठरली.सलग चौथ्या दिवशीही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.सदरील लसीकरण मोहिमेसाठी स्वस्त धान्य दुकानदार मगदूम शेठ व मंचक ढवळे यांनीही सहकार्य केले. मोहिमेच्या सुरुवातीपासून कंधार तहसीलदार एस एस कामटेकर, गटशिक्षणाधिकारी संजय येरमे,जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी बाळासाहेब गोमारे,डॉ.शाम सावंत यांच्याकडून लसीकरणासाठी नागरिकांना सतत आवाहन करण्यात येत आहे.याबरोबरच गावातील जिल्हा प.के.प्रा.शाळा,जिजामाता कन्या शाळा,इंदिरा गांधी प्रा.शाळा,शिवाजी प्रा. शाळा,सर्व अंगणवाडी येथील शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी रॅली काढून लसीकरणासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली.रविवारच्या दिवशीही सर्व शिक्षकांनी गावात घरोघरी जाऊन लासीकरणासंदर्भात जनजागृती केली.लसीकरणाच्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी तहसीलदार एस एस कामटेकर,मंडळ अधिकारी गजलवार,डॉ.शामराव सावंत, ग्रामसेवक विलास कल्हाळे,तलाठी प्रभाकर बोडावार, सहशिक्षक दत्ता थोटे,दत्तात्रय कदम,रमेश भुरे,गोविंद नाईक,बालाजी केंद्रे,भानुदास थोटे यासह आरोग्य कर्मचारी निलेवाड,शीला पिनाटे,नंदा भोसले अंगणवाडी कर्मचारी कविता टोकलवाड, सुमन झाम्बरे,चंद्रकला श्रीमंगले,गंगासागर चिवडे आदींची परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *