श्री शिवाजी विधी महाविद्यालय मध्ये लसीकरण शिबिर संपन्न!
दिनांक 29 10 2019 रोजी श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवाजी विधी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले , या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व उद्घाटक म्हणून संस्थेचे सचिव मा. गुरुनाथरावजी कुरुडे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम गीताने होऊन ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना व कोरोणा काळात बळी गैलेल्या सर्वांना आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम.एल. धर्मापुरीकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात कोरोना लसीकरणाचे महत्त्व सांगून, लस का घ्यावी? याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच अध्यक्षीय समारोपात संस्थेचे सचिव गुरुनाथरावजी कुरूडे यांनी लसीकरण शिबिर महाविद्यालयातच न घेता प्रत्येक गावागावात घेणे गरजेचे आहे, असे सांगून , करुणा महामारीत कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाले, बालक निराधार झाले, देशावर फार मोठे संकट येऊन, सर्व जनजीवन विस्कळीत झाले अशा वेळी सरकारने लसीकरण मोहीम राबवून पूर्ण भारतभर लसीकरण करण्याची जबाबदारी स्वीकारली ही अभिनंदनीय बाब आहे. अशा वेळी सर्वांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा व आपले जीवन, आपला परिवार व पर्यायाने समाज,देश सुरक्षित करावा असे आवाहन केले.
या लसीकरण शिबिरासाठी कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सूर्यकांत लोणीकर व श्रीनिवास घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिकल ऑफिसर-डॉक्टर नम्रता ढोणे, सुरेखा मैलारे, अंकुश राबवड, डी. के. कांबळे नगर परिषद कर्मचारी यांच्या टीम ने महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांचे लसीकरण केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मुख्य लिपिक सुधाकर कौसले, विकी यन्नावार, मधुकर धोंडगे, ब्रह्माजी तेलंग, श्री फुलवरे संस्थेचे सदस्य प्रा. शंकरराव आंबटवाड, प्रा. शिवराज चिवडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. एल. डोम्पले यांनी केले तर ग्रंथपाल सुनील आंबटवाड यांनी आभार मानले,राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.