विद्यार्थ्यांना केंद्रीस्थानी ठेवून कार्य करा – सहसंचालक डॉ. विठ्ठल मोरे


मुखेड -नॅकचा महाविद्यालयास चांगला दर्जा प्राप्त करावयाचा असेल तर त्यासाठी महाविद्यालयात विविध स्तरावरील कार्यक्रम घ्यावे लागतील. कोरोनाच्या संकटाच्या काळातही आपणास ऑनलाईनच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेता येतात. अनेकांनी याचा फायदा घेतला आहे, आपणही तो घ्यावा.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले पाहिजे. विविध विषयाच्या परिषदा, संशोधन प्रकल्प घ्यावेत.प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त महाविद्यालयात वेळ द्यावा. नेहमी आपण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असले पाहिजे. प्राध्यापकांनी जास्तीत जास्त ज्ञान मिळवावे व ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. यूट्यूब चैनल वर आपले विषयाचे ज्ञान व अन्य ज्ञान प्रसारित करावे. मीडियाचा वापर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करावा.

विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करा असे प्रतिपादन नांदेड विभागाचे उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. विठ्ठल मोरे यांनी ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय, वसंतनगर ता. मुखेड जी. नांदेड येथे सदिच्छा भेट प्रसंगी बोलताना व्यक्त केले.


अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड म्हणाले की आमच्याकडे ज्या गोष्टी अपूर्ण आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. कोरोना महामारीच्या काळात आम्ही विद्यार्थ्यांसाठी व प्राध्यापकांसाठी ऑनलाइन माध्यमातून अनेक उपक्रम राबविले आहेत.विविध विषयाच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषदांचे आयोजन केले.आमचा स्टाफ हा मीडीयाचा जास्तीत जास्त वापर विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृध्दीसाठी करतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न या महाविद्यालयातून केला जातो.

आमची संस्था व सहकारी एका ध्येयाने प्रेरित होऊन कार्य करतात.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे मुख्य ध्येय आहे. डॉ. विठ्ठल मोरे सरांनी आमच्या महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.विठ्ठल मोरे यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड यांनी केला तर उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालय नांदेडचे मुख्य लिपिक सुभाष धोंडगे यांचा सत्कार आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. बळीराम राठोड यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ.व्यंकट चव्हाण यांनी केले तर आभार सहस्टाफ सेक्रेटरी प्रा.सौ. शिल्पा शेंडगे यांनी मानले.


या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरूणकुमार थोरवे, माजी प्राचार्य डॉ.रामकृष्ण बदने, डॉ.देविदास केंद्रे,सिनेट सदस्य प्रा. डॉ.संजीव रेड्डी,कार्यालय अधीक्षक श्री रमेश गोकुळे व सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *