राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मच्याऱ्यानी पुकारलेल्यास आंदोलनास मामा मित्र मंडळ या सामाजिक संघटनेचा पाठींबा
कंधार ; प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मच्याऱ्यानी २७ ऑक्टोबर पासून पुकारलेल्या न्याय मागण्यासाठी धरणे आंदोलन राज्यभरात पुकारले आहे. कंधार येथे कर्मचार्यांनी पुकारलेल्या उपोषणास शुक्रवार दि.२९ ऑक्टोबर रोजी मामा मित्र मंडळ या सामाजिक संघटनेचा पाठींबा दिला असल्याचे मारोती मामा गायकवाड यांची माहिती दिली असून मागण्या मान्य करून एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याची मागणी केली.
एसटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या उपोषणास राज्य शासन कुठल्याच प्रकारची दखल घेत नाही, त्यामुळे राज्यात जवळपास तीस कर्मचाच्यांनी आत्महत्या करून जिवनयात्रा संपवली आहे.
कर्मचार्यांच्या रास्त मागण्या सरकारने तात्काळ मान्य करून दिवाळी गोड करावी अशी मागणी यावेळी मारोती मामा गायकवाड यांनी केली आहे.


