वडीलाचा स्मृतीदिनी सायकलस्वारांना इंधन बचतश्री पुरस्कार प्रदान करुन अनोखे अभिवादन ; हरहुनरी कलाशिक्षक दत्तात्रय एमेकर यांचा कार्यक्रम

कंधार ; प्रतिनिधी

कंधार म्हणटले की स्मरते डाॅ.भाई केशवराव धोंडगे आणि डाॅ.भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या क्रांतिच्या चळवळीचे केंद्र,कंधारच्या मातीत राष्ट्रकुट काळा पासून कला व शिल्पकला यांची जणु पंढरीच!

कंधारपुर नावाने आजही ऐतिहासिक वारसा लाभले मन्याड खोर्‍यातील दर्‍या कपारीत वसलेला दुर्गम तालूका पण येथील लोकांवर चळवळीची पकड आहे.

श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या लोकप्रिय संस्थेने निजामाची राजवट संपताच आपले शैक्षणिक कार्य आरंभ केले.संस्थापक व संचालक डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे व भाई गुरुनाथरावजी कुरुडे या जोडगोळीने मातोश्री मुक्ताई धोंगडे यांच्या प्रेरणेतून शैक्षणिक क्रांति केली.

कंधार शहरात तास दोन तास सायकलींग करुन आपल्या आरोग्या सोबत पर्यावरणाचे व इंधन बचतीचे कार्य गेली दिड-दोन वर्षांपासून करत आहे.ही बाब गोपाळसुत दत्तात्रय एमेकर यांच्या लक्षात आली.त्यांनी आपल्या वडीलांचे गेल्या 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले.

या वर्षी त्यांचा प्रथम स्मृतीदिन मराठी महिन्याच्या तिथी नुसार दि 28 ऑक्टोबर 2021,मिती आश्विन कृ.७ शके १९४३ रोजी सकाळी सात वाजता कार्यक्रम आरंभ झाला.

पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालाजीराव चुकलवाड (जिल्हाध्यक्ष माजी सैनिक संघटना नांदेड) तर प्रमुख पाहूणे,नगराध्यक्षा सौ.शोभाताई अरविंदराव नळगे यांचे प्रतिनिधी विद्यमान नगरसेवक शहाजी नळगे, डाॅ.प्रा.गंगाधर तोगरे व शिवसेनेचे निष्ठावंत गणेशभाऊ कुंटेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

पहिल्या प्रथम वंदेमातरम गीतातून भारत मातेस वंदन करण्यात येवून भारत मातेच्या रक्षणार्थ धरातीर्थी पडलेल्या शहिद वीरांना व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना आणि दिवंगत भाई गोपाळराव एमेकर गुरुजी,कै. पुरजवार यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

अभिवादन पिठावरील मान्यवरांच्या समर्थ हस्ते दिवंगत भाई गोपाळराव एमेकर यांच्या छायाचित्रास माल्यार्पण करुन प्रत्यक्ष पुरस्कार वितरण समारंभ आरंभ झाला.

तहसिलदार व्यंकटेश मुंडे,डाॅ.भगवान जाधव,डाॅ.कैलास फाजगे, डाॅ रामभाऊ तायडे,डाॅ स्वप्निल रणदिवे,अॅड नीरज कोळनुरकर,कृष्णा चालिकवार,सुनिल सादलापूरे,दिनेश व्यास,विजय गोटमवाड,भास्कर नळगे,प्रकाश नळगे,कदम के.पी.,मा.विक्की बिडवई,गणेश मारे,सचिन परभणीकर,मा.उदय पदमवार, मा.अॅड अनिल डांगे,कैलास देवडे,राजेश मामडे,शंतनु कैलासे ,प्रदीप कल्हाळे विजय मांगुळकर,, रहिम पठाण, सर्व कंधार यांना मान्यवरांच्या समर्थ हस्ते पुरस्कार प्रदान केले.

प्रमुख अतिथी गणेश कुंटेवार यांनी सायकलींग करणाऱ्या सर्व सायकलस्वाराचे कौतुक करतांना हा उपक्रम हाती घेतल्याने अनेकजण यातून नक्कीच प्रेरणा घेवून सायकल वापरण्याचे आकर्षिक होवून पर्यावरण, त्यांचे आरोग्य उत्तम राहिल. सायकल स्वारांची संख्या कंधार शहरात वाढावी असा मनोदय व्यक्त केला.

प्रमुख अतिथी श्री शिवाजी काॅलेज कंधारचे शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डाॅ.गंगाधर तोगरे यांनी सायकलींग व स्विमिंग आणि योग-प्राणायाम यामुळेच शरीर निरोगी अन् निकोप, सुदृढ बनते.मानवाचे सर्वात महत्वाचे धन आरोग्य आहे.या टिममध्ये माझे शिषोत्तम सहभागी असल्यामुळेच मला त्याचा सार्थ अभिमान वाटतो आहे.सुलेखनकार दत्तात्रय एमेकर यांच्या कल्पकतेचे तोंडभरून कौतुक करुन, या सायकलींग टिमची उत्तरोत्तर प्रगती व्हावी.डाॅ.प्रा तोगरे सर यांच्या मौलीक मार्गदर्शनाने कार्यक्रमास चार चांद लागले.

मन्याड खोर्‍यातील स्फूर्तिदायक उपक्रमातून पाठलेल्या शौर्यवंत उपक्रमाचे कौतुक करुन सदिच्छा देत.दिवंगत गोपाळराव एमेकर यांना अभिवादन केले.

अध्यक्षीय समारोप करतांना चुकलवाड सर यांनी या स्तूत्य उपक्रमचे कौतुक करत अध्यक्षीय समारोप केला.

सत्कारास उत्तर देतांना सायकलींग टिमचे प्रतिनिधी म्हणून अँड अनिल डांगे यांनी हा पुरस्कार म्हणजे आम्हास उर्जाच देणारा .एमेकर सरांचे सर्वांच्या वतीने आभार व्यक्त केले.

आभार प्रदर्शन प्रा.संजिव मेहेत्रे यांनी करतांना प्रदुषण हे पर्यावरणास घातक होत आहे.जर सर्वांनी सायकलचा वापर केल्याने पर्यावरण, आरोग्य अन् इंधनाची होवून राष्ट्रीय कार्य केल्याचे समाधान मिळते. सुत्रसंचलन गोपाळसुत दत्तात्रय एमेकर यांनी केले.तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.चहा-पाना नंतर कार्यक्रम संपला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *