नांदेड :- कंधार तालुक्यातील राऊत खेडा येथील प्राथमिक आरोग्य उप केंद्राच्या वतीने मिशन कवच कुंडल अभियानांतर्गत राऊतखेडा ग्रामपंचायत अंतर्गत लसीकरण शिबीरास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये या उद्देशाने शासनाकडून करून कोरोना आजारासाठी लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी शहरी भागासह ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जात आहे त्या अनुषंगाने राऊतखेडा ग्रामपंचायत अंतर्गत 2687 नागरिकांनी लसीकरनाचे डोस घेतले आहेत तर आज पर्यंत राऊतखेडा येथील नागरिकांनी पहिला डोस 1832 व दुसरा डोस 910 असे मिळून ऐकून 2742 जणांची कोरोना लसीकरण झालेले आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना लसीकरण सत्राचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. कोरोना चा एकही डोस न घेतलेल्या धारकांना लसीचा डोस घ्यावा यासाठी विविध माध्यमाद्वारे प्रोत्साहित करण्यात येत आहे.
कोरोना लसीकरण शिबीर प्रा. आरोग्य केंद्र बारूळ वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश दुलेवाड व डॉ. खिलारे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले तर या शिबिराला यशस्वी करण्यासाठी सरपंच सौ महानंदा मडके व उपसरपंच दैवसाला गर्जे ग्राम विकास अधिकारी श्री चोंडे, तलाठी श्री सुखदेव औटी, ग्रामपंचायत सदस्य सुमित बारादे, संजय डिंकले, गंगाबाई मालेगावे, मारोती कांबळे, विमलबाई घोसले,आरोग्य निरीक्षक श्री.बि. एम. गालशेटवार, आरोग्य समुदाय अधिकारी श्रीमती अंबिका माटोरे मॅडम, एम.पी.डब्लू.श्री.व्ही.पी. गोडबोले. लस टोचक श्रीमती जे.ए. गित्ते.पार्ट टाइम श्रीमती जिजाबाई कांबळे व सर्व अंगणवाडी सेविकांनी तसेच सर्व ज़िल्हापरिषद शिक्षक वृंद यांनी प्रयत्न केले.
यावेळी माझी सरपंच प्रेमानंद गर्जे,तंटामुक्ती अध्यक्ष श्री.गजानन घोसले, ग्रामपंचायत सेवक सिद्होधन गर्जे, रोजगार सेवक रावसाहेब सूर्यवंशी, पोलीस पाटील प्रतिनिधी महानंद गर्जे, मारोती मडके, उपसरपंच प्रतिनिधी किरण गर्जे, सतीश बारादे,मारोतीमामा सिंदगे व सर्व समस्त गावातील नागरिकांचे सहकार्य लाभले