युवा स्वास्थ अभियान कोविड – १९ लसीकरणास चांगला प्रतिसाद
धर्मापुरी ( प्रतिनिधी प्रा. भगवान आमलापुरे )
येथील कै शंकरराव गुट्टे ग्रामीण कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र धर्मापुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोविड १९ – लसीकरण शिबिरास अर्थात युवा स्वास्थ्य अभियानास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभाग्रहात आयोजित मिशन युवा स्वास्थ्य कवचकुंडल ,कोविड - १९ लसीकरण शिबीर दि २७ आक्टो २१ रोजी राबविण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या युवा स्वास्थ्य अभियानास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रा एस जे चाटे, प्रा कासारे एस एल आणि प्रा राहुल गायकवाड यांनी पण लसीकरण करून घेतले.
शिबीर यशस्वीतेसाठी वर्षा नागरगोजे मँडम,इंगळे एस आर मँडम,सौ मुंडे मँडम आणि वैभव लष्करे यांनी परिश्रम घेतले.यावेळी कार्यालयीन अधिक्षक संभाजी अंबेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा डॉ पी डी मामडगे यांनी केले. तर आभार वाणिज्य विभाग प्रमुख प्रा अविनाश मुंडे यांनी व्यक्त केले.