मुखेड- ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय,वसंतनगर ता. मुखेड येथील माजी प्राचार्य डॉ.रामकृष्ण बदने यांचे वडील वै.दत्तात्रय भाऊराव बदने यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त मौजे देवकरा ता.अहमदपुर जि.लातुर येथे दोन दिवसीय किर्तन महोत्सवाचे आयोजन खालील प्रमाणे करण्यात आले आहे.
दि.०१ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ९.०० ते ११.०० या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्यांची कीर्तन टीव्ही वरती संपन्न झाली. असे संतसेवक ह. भ. प. बंडोपंत महाराज ढाकणे परळी वै.यांचे किर्तन आयोजित केले आहे. तसेच दुस-या दिवशी दि.०२ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १.००ते ३.०० या वेळात महाराष्ट्रातील ख्यातकीर्त किर्तनकार ज्यांची अनेक किर्तन झी टॉकिजवर प्रसारीत झाली आहेत असे ह.भ.प.माऊली महाराज खडकवाडीकर परभणी यांचे सूश्राव्य असे किर्तन होणार आहे व तदनंतर लगेचच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तेंव्हा वरील कार्यक्रमांचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन संयोजक प्रा. डॉ. रामकृष्ण बदने, श्री भागवत दत्तात्रय बदने,प्रा.योगिराज दत्तात्रय बदने यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
यापूर्वी पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगावकर, प्रभाकर (नाना)महाराज झोलकर, व्याकरणाचार्य अर्जूनजी लाड गुरुजी,ह.भ.प.वासुदेव शास्त्री मुंडे महाराज,ह.भ.प. विठ्ठल महाराज दिवेगावकर आदींची हरिकिर्तन झाले आहेत.