विद्यार्थ्यांना बाल शिक्षण हा ग्रंथ भेट देऊन विद्यार्थी दिन साजरा..!

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ०७ नोव्हेंबर १९०० रोजी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये ( आता प्रतापसिंह हायस्कूल ) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. येथे ते इ.स. 1904 पर्यंत म्हणजेच चौथी पर्यंत शिकले..!

२०१७ साली महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून घोषित केला. अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश दिनाचे स्मरण व्हावे म्हणून, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्यांच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी, म्हणून युवा साहित्यिक सोनू दरेगावकर, नांदेड यांच्या पुढाकाराने दिनांक ०७/११/२०२१ रोजी. विठ्ठल नगर नांदेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मा. देविदास बैलकवाड यांच्या हस्ते करून विद्यार्थ्यांना पुरुषोत्तम खेडकर लिखित बाल शिक्षण हा ग्रंथ भेट देऊन विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला..!

याप्रसंगी,
युवा साहित्यिक सोनू दरेगावकर, देविदास बैलकवाड, सुनील पतंगे, रामदास पारधे, राम गजभारे, कपिल बैलकवाड, पिंटू बैलकवाड, बजरंग बैलकवाड, गुरुनाथ कांबळे, गोविंद बैलकवाड, अमित थोरात आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती..!

– सोनू दरेगावकर, नांदेड..!

दिनांक- ०७/११/२०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *