फुलवळ ( प्रा भगवान आमलापुरे )
आम्ही वर्गमित्रं, बँच १९९२ – ९३ या व्हाट्सएप ग्रुपच्या सदस्यांना दिवाळी फराळासाठी प्रदिप कल्हाळे यांनी आमंत्रित केले आणि बोलता बोलता सहजंच गत ३५ वर्षे जुन्या आठवणी ताज्या झाल्या. लाँकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात बँच १९९२ – ९३ क्लासमेंट अर्थात आम्ही वर्गमित्र १९९२ – ९३ हा व्हाट्सएपचा ग्रुप आमचे सन्मानीय वर्गमित्र डॉ कासीम ख मोमीन यांनी तयार केला.
त्या माध्यमातून आम्ही सर्व वर्गमित्र समाज माध्यमावर सक्रिय सहभागी झालो , एकत्र आलो. या ग्रुपमध्ये सर्वजण अँडमिन आहेत. या माध्यमातून श्री बसवेश्वर विद्यालय फुलवळ येथील आम्ही वर्गमित्र एकत्र आलोत. सणासुदीला आणि विशेषतः दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीच्या काळात एकत्र येतो आणि गप्पांचा फड रंगतो. एकमेकांचे सुखदुःख सांगितले आणि ऐकले जातात. अधूनमधून आपुलकीने
सहभोजनही आयोजित केले जाते.
याच गोष्टीचा पुन्हा एकदा म्हणजे परवा पण प्रत्यय आला. यासाठी विजु सावकार ( सादलापुरे ) यांनी पुढाकार घेतला. आणि आम्हा वर्गमित्रांना एकत्र आणलं. त्यासाठी कारण होते आमचे वर्गमित्र, बँच १९९२ – ९३ या व्हाट्सएप ग्रुपचे सन्मानीय सदस्य प्रदिप घैनाजीराव कल्हाळे यांच्या घरी दिवाळी स्नेहमिलनाचे अर्थात दिवाळी फराळाचे.
भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे दि ०७ नोव्हें २१ रोजी रविवारी आम्ही वर्गमित्रांनी मुक्ताई नगर कंधार स्थित प्रदिप कल्हाळे यांच्या घरी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ,” फुलवळ मित्रमंडळ ” या नावाने सप्रेम भेट दिली.
यावेळी घैनाजीराव काका, सौ कल्हाळे काकू, प्रदिप कल्हाळे , सौ कल्हाळे वैनीसाहेब आणि चिरंजीव प्रथ्वीराज कल्हाळे उपस्थित होते. यात दिगांबर मंगनाळे ( पाणीसांगे ) ,कैलासावर डांगे, डॉ कासीम मोमीन, माधवराव सोमासे, विजयकुमार सादलापुरे, नवनाथ जेलेवाड, पांडुरंग शेळगावे, दत्ता कंधारे, आणि प्रा भगवान आमलापुरे यांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ,आपल्या शालेय जीवनास उजाळा देतांना विजु सावकार म्हणाले की आम्ही ०५ वी,०६ वीत असताना प्रदिपच्या घरी जाऊन, काकू घरी असोत अगर नसोत, काकूनी शुद्ध तुपात तयार केलेले बेसनाचे लाडू खायचो.त्या लाडूंची चव आजही जिभेवर रेंगाळते आहे. ती चव आजही ताजी आहे. त्यामुळे जवळपास ३५ वर्षे जुन्या आठवणी ताज्या झाल्या. बालपण आणि बालमन डोळ्यात तरळून गेलं,उभं राहिलं.
तर दत्ता कंधारे आपल्या मनोगतात म्हणाले की प्रदिप सरचा आणि माझा रोजंच रामराम होतो. पण प्रदिप सर त्यांच्या गरबडीत असतात आणि मी माझ्या गरबडीत असतो. त्यामुळे आजंच प्रदिप सरच्या घराच्या पायऱ्या चढून आत घरात येण्याचा योग जुळून आला आहे तो आम्हा वर्गमित्रांमुळे.
Good Message