कंधार प्रतिनिधी /उमर शेख
कंधार तालुक्यातील अंबुलगा येथे युवा सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस समर्थक पप्पू भाई मुसळे यांनी अनोखा उपक्रम आपल्या सर्कल मध्ये आयोजित करतात त्यामध्ये राबवून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात.
आमच्या सर्व वर्गमित्रांनी स्नेह मिलन कार्यक्रमांमध्ये सर्वांच्या उपस्थितीत साक्षीने हा कार्यक्रम एकत्रित घडवून आणण्याचा उपक्रम दिवाळीच्या सणांमध्ये सर्व मित्र मंडळी एकत्रित गावाच्या विकासास व सर्वांच्या सुख-दुःखात मध्ये सामील होण्याचा संकल्प घेऊन आपल्या आईवडिलांची काळजी, बहीण भावाची काळजी, त्यांच्यावर प्रेम , आदर बाळगून सहकार्य करण्याचा संकल्पना हाती घेतलेला आहे .
या तरुणांनी आदर्श आपलं कुटुंब आपली जबाबदारी या भावनेने संकल्पना घेतलेली आहे.
दिवाळी निमित्ताने सर्व वर्ग मित्रांचा स्नेह मिलनाचा कार्यक्रम राबवून आपल्या मित्रांना सामाजिक कार्य कसे करता येईल व गाव विकासासाठी काय करू शकता अशी नवीन योजनाचा अभ्यास करून सर्वसामान्य गरीब जनतेपर्यंत कशा पर्यंत राबता येईल या सर्व बाबीवर चर्चा करण्यात आली .
हा कार्यक्रम माणिक प्रभू विद्यालय अंबुलगा या शाळेमध्ये सर्व वर्गमित्रांच्या सहकार्याने राबविण्यात आला .यामध्ये सर्व वर्गमित्र जीवन तेलंग, ज्ञानोबा केंद्रे ,शंकर श्रीमंगले, बालाजी तेलंगे ,पांडुरंग मुंडे ,रामेश्वर मुसळे ,माधव मुसळे, कैलास गित्ते, राजीव मुसळे ,आकाश तेलंग, नारायण स्वामी, प्रवीण भागवत ,शादिक, भागानगरे, पांचाळ, आणि सर्वांनी मिळून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आहे .
यापुढेही कार्यक्रम चालू राहणार आहे याची खात्री दिली आहे मित्रमंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस समर्थक व सामाजिक कार्यकर्ता पप्पू भाऊ मुसळे यांनी केले होते.