कंधार ; प्रतिनिधी
आज दिनांक 9 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी मा.प्रशांत दिग्रसकर साहेब शिक्षणाधिकारी (मा.) जि.प. नांदेड ,मा.दिलीप बनसोडे उपशिक्षणाधिकारी (मा.)जि.प.नांदेड यांनी गट साधन केंद्र कंधार येथे आकस्मिक भेट देऊन सदर बैठकीस
NAS परीक्षेसाठी निवड झालेल्या सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी आपल्या निवड झालेल्या वर्गाच्या वर्ग शिक्षकाकडून वर्गातील सर्व विद्यार्थ्याकडून अध्ययन निष्पत्ती नुसार सराव करून घेणे. NAS परीक्षा च्या दिवशी 100% विद्यार्थी उपस्थित ठेवण्याबाबत सूचना दिल्या.
दिनांक 10 ते 11 या दोन दिवसांमध्ये निवड झालेल्या शाळे /वर्गामधील मुलांकडून प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करून घेणे. दिग्रस कर साहेब यांनी सदरील बैठकीमध्ये परीक्षेच्या दिवशी विद्यार्थी कसे उपस्थित ठेवावेत यासाठी मुख्याध्यापक निहाय केलेल्या उपाय योजना चे माहिती घेतली व Nas परीक्षे विषयी सखोल मार्गदर्शन केले.
तसेच संजय येरमे गशिअ, पं.स. कंधार यांनी कंधार मध्ये बदल होत नाही असे न म्हणून बसता गटसाधन केंद्र, कंधार या इमारत व परिसराचा कायापालट केलाआहे. जि.प.हाय. मुलांचे, कंधारच्या पाठीमागे एक नंदनवन तयार होत आहे. PRC दौरा दरम्यान जिपच्या शाळेमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणला आहे .
कार्यालयाच्या परिसरामध्ये वृक्ष लागवडीची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली. असे मा.श्री प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी मा. जि.प. नांदेड यांनी कंधार तालुक्याची प्रशंसा केली.
मा. श्री दिलीप बनसोडे उपशिक्षणाधिकारी जि प नांदेड यांनी NAS परीक्षा पूर्वतयारी बैठकीमध्ये NAS परीक्षेसाठी निवडले या शाळेत निवडलेल्या शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षक यांना विषय निहाय मार्गदर्शन केले.
ज्या क्षेत्रीय अन्वेषक ज्यांना शक्य आहे अशांनी परीक्षेच्या एक दिवस आगोदर शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधावा जेणेकरून परीक्षेच्या दिवशी विद्यार्थी घाबरणार नाहीत परीक्षेच्या दिवशी शंभर टक्के विद्यार्थी उपस्थित ठेवावेत.
यानंतर मा.प्रशांत दिग्रसकर साहेब यांचा सत्कार श्री संजय येरमे गटशिक्षणाधिकारी ,पं.स. कंधार यांनी केला व मा.दिलीप बनसोडे साहेब यांचा सत्कार श्री राजेश्वर पांडे सर यांनी केला.
तसेच शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख व कार्यालयीन स्टाफ उपस्थित होता.