माधव भालेराव
नगरपालिका,जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि लोकसभा निवडणुकी नंतर तब्बल तिन वर्षांनी विधानसभा निवडणुक आहे.या तिन वर्षात काय राजकीय उलथापालथ होईल हे आताच सांगता येणार नाही.
लोहा-कंधार मतदार संघावर जास्त काळ डाॕ.केशवराव धोंडगे यांचे वर्चस्व राहिले आहे. केशवराव धोंडगे यांच्या राजकारणाला शिवसेनेने सुरुंग लावून रोहिदास चव्हाण यांच्या रूपाने या मतदार संघात कालांतराने बदल झाला.
मतदार संघातील वेगवेगळ्या नेत्यांना आमदार होण्याचा मान दिला.परंतु सन 2004 पासुन दर वेळेस परिवर्तन केले हा इतिहास आहे.सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंधरा दिवसात आलेल्या श्यामसुंदर शिंदे यांना आमदार होण्याची संधी येथील मतदारांनी दिली आहे.
सध्या या मतदार संघात चिखलीकर -शिंदे या दोनच नावाची चर्चा होती. परंतु आता एकनाथ पवार हे नाव चर्चेचा विषय बनला आहे. विधानसभा निवडणुक तीन वर्ष लांब असली तरी एकनाथ पवार यांनी मतदार संघात गाठी भेटी घेऊन मतदार संघात जोरदार तयारी चालू केली असल्याने येणाऱ्या निवडणुकीत एकनाथ पवार हे चिखलीकर -शिंदे यांची डोकेदुखी वाढवू शकतात हे नाकारता येणार नाही.
कंधार मतदार संघ हा ऐतिहासिक मतदार संघ भाई केशवराव धोंडगे यांच्या नावाने या मतदार संघाची ओळख आहे.सध्या या मतदार संघात चांगल्या माणसाची किंमत नसुन पैसाचाच बोलबाला आहे.या मतदार संघात कितीही विकास कामे केली तरी येथील जनतेला त्याचे काहीच देणेघेणे नसते हा इतिहास निर्माण झाला आहे.
निवडणुका जवळ आल्या की, येथील मतदार विकासाचा नाही तर पैसाचा हिशोब लावण्यात मग्न असतो. निवडणुकीत नेत्यांची किती ही लोकप्रियता असली तरी नेत्यांना पैसे वाटल्या शिवाय निवडणुक जिंकता येत नाही हेच या मतदार संघाचे वास्तव्य आहे.म्हणून हा मतदार संघ ऐतिहासिक असला तरी विकासा पासुन कोसो दुर आहे.पुर्वी निवडणुका पक्षावर,तत्त्वावर आणि निष्ठेवर होत होत्या आता फक्त पैसावर होताना दिसत आहेत.
या मतदार संघातील नेता कोणत्या पक्षात आहे हेच कार्यकर्त्यांना लवकर कळत नाही.सध्याचे कार्यकर्ते हे पक्षनिष्ठ नसुन व्यक्ती निष्ठ झाले आहेत.
भाई केशवराव धोंडगे यांच्या राजकारणाला सुरुंग लावून 1994 मध्ये रोहिदास चव्हाण हे आमदार झाले त्या दह वर्ष या मतदार संघावर राज्य केले.सन 2004 मध्ये नोटशाहीने जन्म घेतला आणि प्रताप पा.चिखलीकर हे आमदार झाले.सन 2009 मध्ये शंकर अण्णा धोंडगे यांना जनतेनी निवडुन दिले.सन 2014 साली परत प्रताप पा.चिखलीकर हे पुन्हा आमदार झाले.2019 मध्ये पंधरा दिवसात आलेले श्यामसुंदर शिंदे यांना मतदारांनी आमदार केले.
लोहा कंधार मतदार संघात शंकर अण्णा धोंडगे,अॕड.रोहिदास चव्हाण ,मुक्तेश्वर धोंडगे हे एकेकाळी वजनदार असलेले नेते होते परंतु आज यांची राजकीय ताकत कमी झाली आहे.सध्या मतदार संघात चिखलीकर व आमदार शिंदे यांच्याच नावाची चर्चा होती.आता या दोघात तिसरा आला आहे.
एकनाथ पवार हे मुळात भाजपचे निष्ठावंत म्हणून चांगलीच ओळख आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या महापालिकेचे भाजपचे गटनेते,विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
एक मोठे उद्योगपती म्हणून त्यांची ओळख आहे.एकनाथ पवार यांची कर्मभुमी ही पुणे असली तरी त्यांची जन्मभुमी ही लोहा तालुक्यातील रामतिर्थ हे गाव आहे.
पुण्यासारख्या मोठ्या शहरातील राजकीय खिलाडी आता लोहा कंधार मतदार संघातुन निवडणुक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.गेल्या सहा महिन्या पासुन ते सातत्याने मतदार संघात फिरत असुन अनेकांना मदत करत आहे.
निवडणुक तिन वर्ष लांब असली तरी साम,दाम,दंड ही सर्वच निती अवलंबून निवडणुक लढवण्याची जोरदार तयारी करत आहेत.
लोहा कंधार मतदार संघात आज पर्यंत मराठा समाजाचे वर्चस्व आहे.केशवराव धोंडगे,रोहिदास चव्हाण,प्रताप पा.चिखलीकर ,शंकर अण्णा धोंडगे,श्यामसुंदर शिंदे हे सर्व मराठा समाजाचे नेते असुन यांना आमदारकीचा मान मिळाला आहे.
ओबिसी समाजातील गुरुनाथ कुरुडे व ईश्वरराव भोसीकर हे दोन नेते वगळता पुन्हा या मतदार संघात ओबिसी नेता निवडुन आला नाही.या मतदार संघात ओबिसी नेते आहेत परंतु येथील मतदार त्यांचा स्विकार करत नाही हे वास्तव आहे.
त्यामुळे या मतदार संघाला मराठा समाजाचेच नेतृत्व लागते.एकनाथ पवार हे नवखे असले तरी ते मराठा आहेत त्यामुळे कार्यकर्ते जोडण्यासाठी त्यांना जास्तीचा वेळ लागणार नाही.
पवार गेल्या सहा महिन्या पासुन या मतदार संघात काम करत असल्याने आज ते चर्चेचा विषय बनले आहेत.सध्या ते भारतीय जनता पार्टीचे नेते असुन त्यांना राज्याच्या भाजपात चांगलाच मान आहे.
खा.प्रताप पा.चिखलीकर हे मुळात काँग्रेस पक्षाचे आहेत.त्यांनी 2004 पासुन अनेक पक्ष बदलले आहेत.लोकसभा निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांचा पराभव केल्यामुळे भाजपात त्यांना मोठे स्थान मिळाले आहे.
देगलुर मतदार संघात सुभाष साबने विजयी झाले असते तर खा.चिखलीकर यांना भविष्यात केंद्रात मंत्री पद मिळाले असते परंतु देगलुरमध्ये भाजपला हार पत्करावी लागल्यामुळे खा.चिखलीकर यांचे खच्चिकरण झाले आहे.
प्रताप.पा.चिखलीकर हे दिल्लीचे नेतृत्व करत असले तरी खासदार म्हणून काम करण्यात त्यांना जास्तीची आवड नसुन महाराष्ट्राच्या राजकारणातच त्यांना जास्तीचा रस आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीतच प्रविन पा.चिखलीकर यांना आमदार करण्याच स्वप्न शिवसेना भाजप युतीने भंग केलं .
या निवडणुकीत मात्र खा.चिखलीकर विधानसभा लढवतील असे वाटत आहे.परंतु एकनाथ पवार हे भाजपच्या नेत्यांच्या जवळीक असल्याने चिखलीकर यांना उमेदवारी मिळण्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
एकनाथ पवार हे विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करत असले तरी ही निवडणुक तेवढी सोपी नाही.पवार यांना स्वःताची ताकत दाखवण्यासाठी दोन तीन जिल्हा परिषद सदस्य व चार पाच पंचायत समिती सदस्य निवडुन आणुन स्वतः ची ताकदा दाखवणे हे महत्त्वाचे आहे.पवार यांनी पक्षाचे लेबल लावुन घेण्या पेक्षा अपक्ष म्हणून लढवले तर त्यांना इतर पक्षातील नेत्यांचा पाठिंबा मिळू शकतो.सन 2004 च्या विधानसभा निवडणुकीत प्रताप पा.चिखलीकर यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढवली होती यावेळी त्यांना अनेकांनी मदत केली होती.त्याच धर्तीवर एकनाथ पवार यांनी अपक्ष निवडणुक लढवली तर यशस्वी होऊ शकतात .