मुक्रमाबाद ;
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या नांदेड जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदी बिलोली येथील माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचनवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड येथील वासवी भवन, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा कार्यालयात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत महासभेची नांदेड जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या प्रसंगी व्यासपीठावर महासचिव गोविंदराव बिडवई, कोषाध्यक्ष सुभाषराव कन्नावार, संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार, प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार, नगरसेवक संजय पांपटवार, जिल्हा निवड समितीचे समन्वयक नंदकुमार मडगूलवार, सदानंद मेडेवाड, किरण वट्टमवार, कायदेविषयक सल्लागार दिलीप मनाठकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली.
प्रारंभी दीप प्रज्वलन, वासवी माता व रंगनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
महासचिव गोविंदराव बिडवई यांनी प्रास्ताविक केले तर महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी मार्गदर्शन केले कायदेविषयक सल्लागार दिलीप मनाठकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
त्यात नांदेड जिल्हा ग्रामीण अध्यक्ष म्हणून विजयकुमार कुंचनवार, उपाध्यक्ष रवींद्र बंडेवार तामसा, वेंकटेश पबितवार देगलूर, राम पत्तेवार मुखेड, अशोक चिन्नावार किनवट, किशोर पबितवार उमरी, सचिव प्रवीण काचावार मुदखेड, सहसचिव गजानन रंगावार बोधडी, साईनाथ वट्टमवार नायगाव,
शिवा मामडे कंधार, सुवेश पोकलवार भोकर, संघटन प्रमुख साईनाथ कामीनवार धर्माबाद, कोषाध्यक्ष सुरेश पंदीलवार मुक्रमाबाद, सहकोषाध्यक्ष सतीश पोरतलवार मांडवी,
श्याम मारुडवार हिमायतनगर, प्रभाकर पत्तेवार, प्रसिद्धीप्रमुख गजानन चौधरी नायगाव, कायदेविषयक सल्लागार अॅड सागर मुखेडकर, सल्लागार सुरेशराव पळशीकर हिमायतनगर, आदींची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
उर्वरित तालुक्यातून निवडून आलेल्या सर्व सदस्यांना जिल्हा सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
नांदेड जिल्हा ग्रामीण चे नवनियुक्त अध्यक्ष विजयकुमार कुंचनवार यांनी महासभेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य समाज बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन याप्रसंगी दिले. तर महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा समाज बांधवांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कार्य करणार आहे महासभा एक संघटन आहे सर्वांनी एकत्र येऊन समाज बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
यापुढे महासभा संपूर्ण महाराष्ट्रात तरुणांना व महिलांना संधी देणार आहे. येणाऱ्या काळात त्यांचीही तालुका व जिल्हा पातळीवर कार्यकारणीची निवड केल्या जाईल असे सांगितले..
महासभेचे सन्माननीय कोषाध्यक्ष सुभाषराव कन्नावार यांची श्री नगरेश्वर वैश्य मंदिर नांदेडच्या नूतन कार्यकारिणीवर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच उपाध्यक्ष म्हणून बिपीन गादेवार यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
तसेच अथर्व महेश वट्टमवार यांनी नीट परीक्षेत 720 पैकी 705 मार्क मिळवून संपूर्ण भारतात खुल्या प्रवर्गातून 62 वा क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्याचे प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार यांनी केले तर आभार संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार यांनी मानले…….