कंधार ; प्रतिनिधी
कंधार नगरपालिका अंतर्गत रस्ते ,स्वच्छता व कायमस्वरूपी विस्थापित व्यापाऱ्यांसाठी व्यापारी संकुल हे प्रश्न प्रथम मार्गी लावणे चालू आहेत . आगामी काळात विकासाच्या दृष्टीने ज्या काही बाबी राहिल्या आहेत त्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून शहराच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही असे आश्वासन आज गुरुवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी माजी नगराध्यक्ष अरविंदराव नळगे यांनी कंधार येथील पत्रकारांशी संवाद साधताना दिले .
माजी नगराध्यक्ष अरविंदराव नळगे यांच्या 72 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . त्यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते .
कंधार शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी एक व्यापारी संकुल बांधणी सध्या चालू आहे , लवकरच आवश्यक त्या बाबीची पूर्तता करून अन्य व्यापारी संकुलाच्या बांधकामाची लवकर सुरुवात करण्यात येणार असून यासह विविध विकास कामांसाठी आवश्यक निधी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे चालू असल्याचे सांगितले.
शहराच्या विकासासाठी सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणे चालू आहे, सर्वच पक्षाचे नगरसेवक सहकार्य करत आहेत . भविष्यातही विकास कामाचे केवळ राजकारण न करता वैचारीक मतभेद बाजुला ठेवून विकासाच्या आड कोणीही राजकारण करू नये असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.
आगामी निवडणुकीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता कंधार येथील जनता सदैव अरविंदरा नळगे यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी असून यापुढेही भरभरून आपले प्रेम आगामी निवडणुकीमध्ये राहणार असा विश्वास यावेळी माजी नगराध्यक्ष अरविंदराव नळगे यांनी व्यक्त केला .
यावेळी कंधार येथील व्यापारी, पत्रकार मंडळी व राजकीय पुढारी मोठ्या संख्येने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.