नांदेड; प्रतिनिधी
भाजप महानगर नांदेड,लायंस क्लब नांदेड सेंट्रल, लायंस क्लब नांदेड मिड टाऊन,अमरनाथ यात्री संघ, बजरंग दल, संस्कार भारती, निसर्ग मित्र मंडळ, मारवाडी युवा मंच, सालासर भजनी मंडळ यांच्या तर्फे गोदावरी गंगा पूजनाचा सोहळा शुक्रवार दि.१९ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी पाच वाजता नगीना घाट येथे होणार असून या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.
यावेळी कोवीड प्रतिबंधक सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे.कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पुरातन काळापासून परीवारातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी महिलांच्यावतीने गंगेची आरती करतात.
नांदेडच्या गोदावरी गंगा पूजनाचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित राहणाऱ्या सर्व महिलांना दरवर्षी मोफत दिवे, द्रौण, फुले देशात फक्त नांदेड मध्येच वितरित करण्यात येतात. हरीद्वार-वाराणशीच्या धर्तीवर नांदेड येथील धार्मिक उत्सवाचे हे अठरावे वर्ष आहे.
शेकडो महिला गोदावरीची आरती करतांना आणि नदीपात्रात हजारो दिवे सोडतांना दिसणारे नयनमनोहर दृष्य पाहण्यासाठी दरवर्षी नांदेडकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते.हरीद्वार-वाराणशीच्या धर्तीवर नांदेड येथील धार्मिक उत्सवाचे हे अठरावे वर्ष आहे. शेकडो महिला गोदावरीची आरती करतांना आणि नदीपात्रात हजारो दिवे सोडतांना दिसणारे नयनमनोहर दृष्य पाहण्यासाठी दरवर्षी नांदेडकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते.
प्रोत्साहन म्हणून वेळेवर येवून शिस्तीत बसणार्या १५०१ महिलांना योगेश जयस्वाल यांच्यातर्फे भेटवस्तू देण्यात येतात. यावर्षी उत्कृष्ट पुजेची थाळी सजविणा-या ३१ महिलांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.संस्कार भारती तर्फे आकर्षक भव्य रांगोळी काढण्यात येणार आहे.
फिटनेस मॉडेल मिस्टर इंडिया रनरअप अथर्व संजय उदावंत यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
तीर्थम तर्फे मध्य प्रदेश व गंगासागर यात्रेला जाणा-या भाविकांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. लायन्सचा डबा, माहेरची उब, कृपाछत्र, कायापालट या उपक्रमामध्ये सहकार्य करणाऱ्या दानशुर नागरिकांचा गौरव करण्यात येणार आहे.संतोषगुरू परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पूजा करण्यात येणार आहे.
सालासार भजन मंडळाचे सदस्य पाच आरत्या गाणार आहेत.या सर्व कार्यक्रमाचे मराठी न्युज चॅनल व स्थानिक केबलवरून प्रसारण करण्यात येणार आहे.सर्वांना मसाला दूध वितरित करण्यात येणार आहे.
महिलांच्या सुरक्षितेसाठी मनपातर्फे जीवरक्षक ठेवण्यात येणार आहे.
कार्यक्रम संपल्यानंतर गुरुद्वारा लंगर साहब तर्फे गुरुनानक जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक व अभूतपूर्व सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्याचा सुवर्ण लाभ नांदेडकरांनी घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा लायन्स क्लब नांदेड सेंट्रल चे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे. ‘