WHO सदस्य डाॅ.दिलीपराव पुंडे यांचा मन्याडी ढंगानी दत्तात्रय एमेकर यांनी केला ह्रदय सत्कार…!

मुखेड ;

सध्या भारतीय समाजात सामान्य अन् असामान्या व्यक्तीमत्व असलेली मानवता धर्म जपणारी अनेक अवलिया आहेत.मोहनावती नगरात सर्पदंश निवारण मसीहा आपली रुग्णसेवेचा अखंड यज्ञ चालवतात. तसेच त्यांचे आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेचे सदस्य म्हणून कार्य सुरु आहे.

मराठवाडा भुषण असून भविष्यातील महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे दावेदार आदरणीय डाॅ.दिलीपरावजी पुंडे यांना डब्लूएचओच्या सदस्यपदी नियुक्त झाल्यानंतर म्हणजे १ मार्च २०२१ रोजी सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारनी “काव्याभिनंदन”नामावली काव्य गुंफूनच त्यांचे काव्य फ्रेम भेट सौ.मालाताई दिलीपराव पुंडे अन् त्यांचे पतिश्वर डाॅ.दिलीपरावजी पुंडे साहेब या दाम्पत्यास आज दि १९\११\२०२१ रोजी मोहनावती नगर(मुखेड) येथील पुंडे हाॅस्पिटल येथे सौ.संगीता दत्तात्रय एमेकर व सुलेखनकार गोपाळसुत दत्तात्रय एमेकर रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा यांच्या समर्थ हस्ते ह्रदय सत्कार करण्यात आला.

डाॅ.दिलीपराव पुंडे साहेब यांनी सत्कारास उत्तर देतांना म्हणाले सर आपण दिव्यांग नसुन तुमची वाटचाल दिव्यत्वाकडे आहे.स्वतःचे आयुष्य जगणे म्हणजे जीवन नव्हे तर इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणे हाच तर जीवन जगण्याचा गाभा आहे.

आपल्या देशात अन्नाच्या कुपोषण पेक्षा वैचारिक कुपोषणाची संख्या अधिक आहे.आजपर्यंत ७५०० सर्पदंश रुग्णांना जीवदान देण्याचे भाग्य मला लाभले.

     काव्याभिनंदन 

गोदाई-गंगाराम यांचा शुभाशीष, 

जांभच्या पुंडे परिवारास आहे!

पांडुरंग-भीमाईच्या पुण्याईने,

डाॅ.दिलीपजी रत्न जन्मले आहे!

अधिश्वरी सौ.मालाच्या सोबतीने,

संसार वेल मांडवाला गेला आहे!

सर्पदंश निवारण तज्ञ झाल्याने,

विश्व स्वास्थ्य सदस्य बनले आहे!

मोहनावती अन् जांबचा रे गौरव,

मनी दीनाप्रती सेवेची भक्ती आहे!

विश्वस्तरावर उमटविली प्रतिमा, 

म्हणून महाराष्ट्राचा बहुमान आहे!

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारी,

सदिच्छा खंडोगणती देते आहे!

     गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर 

     
 क्रांतिभुवन , बहाद्दरपुरा

हा आमचा छोटासा ह्रदय सत्कार स्विकारल्याने आम्हास गौरवान्वीत वाटले.सौ.मालाताई पुंडे अन् डाॅ.दिलीपराव पुंडे या दाम्पत्यानी सौ.संगीता एमेकर अन् दत्तात्रय एमेकर आम्हा दोघांचा एक लेखनी व लोकमत दीपोत्सव -२०२१ भेट देऊन सत्कार केल्याने आम्ही धन्य झालो.

या अनोख्या सत्कार प्रसंगी गुरुदेव विद्या मंदिर ज्ञानलयातील विज्ञान विषयाचे आदर्श शिक्षक राजेशजी डांगे,माझे मामाश्री संताबाई विद्यालयाचे क्रिडा शिक्षक रविंद्रजी ढगे सर, कलावंत गजाजन ढगे, दृष्टांत एमेकर,कु.दृष्टी एमेकर, संदीप जाधव सहित पुंडे हाॅस्पिटलचा स्टाप उपस्थित होता.चहा-पाना नंतर कार्यक्रम संपन्न झाला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *