भाजीपाला विकणा-या पालकाच्या मुलीने घेतले १० वी परीक्षेत ९२ टक्के गुण ;कंधारच्या महात्मा फुले विद्यालयाची विद्यार्थीनी … शेख शाजीद इंन्स्टीट्यूटने घेतली पुढील शिक्षणाची जबाबदारी

भाजीपाला विकणा-या पालकाच्या मुलीने घेतले १० वी परीक्षेत ९२ टक्के गुण ;कंधारच्या महात्मा फुले विद्यालयाची विद्यार्थीनी  …
शेख शाजीद इंन्स्टीट्यूटने घेतली पुढील शिक्षणाची जबाबदारी

कंधार ; प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मा. व उच्च मा.शिक्षण मंडळ लातूर विभागीय मंडळ लातूर च्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल दि.२९ जुलै रोजी जाहीर झाला असून आई भाजीपाला विकणा-या व वडील अँटो चालवणा-या पालकाच्या मुलगी कु.अंकिता श्रीरंग कांबळे हीने १० वी परीक्षेत (९२.८० %),  टक्के गुण घेतले असून ती कंधारच्या महात्मा फुले विद्यालयाची विद्यार्थीनी  आहे.शेख शाजीद इंन्स्टीट्यूटने संचालक शेख साजीद यांनी तिच्या ११ वी व १२ वीच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.घेतली पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.
येथिल महात्मा फुले विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.निकलाबद्दल संत गाडगे बाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डि.एन.केंद्रे ,सचीव चेतन भाऊ केंद्रे, संचालिका सौ.अनुसया केंद्रे, शाळेचे मुख्याध्यापक जे.जी.केंद्रे यांनी कु.अंकिता श्रीरंग कांबळे(९२.८० %), वैष्णवी अशोक गडंबे(९२.४०%),संतोष दत्ता कंधारे(९२%),प्राची कैलास व्यास (९०.८०)आदींसह विशेष प्रविण्यात आलेल्या व प्रथम श्रेणीत आलेल्या सर्व गुणवंतांचे कौतुक करून विध्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी मुख्याध्यापक जे.जी.केंद्रे , डी.जी.वाघमारे,कंधारे बी.एम., घोडजकर एन. एस. ,गुट्टे बी.एस., केंद्रे एच. के.,जाधव आर.बी., गुट्टे जी.टी.,जाधव सि.बी.,शेख फिरदोस युसूफ, गित्ते व्ही. जी., मुंडे एल. जि , केंद्रे ई.बी. यांच्यासह दत्ता कंधारे, अशोक गडंबे, अक्षय व्यास आदीसह पालकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *