कंधार
कंधार शहरात माजी सैनिक संघटना जिल्हा नांदेड व कंधारकरांच्या वतीने बोधीसत्व, भारतरत्न, संविधानकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर लिखीत संविधान दिन आणि मुंबई शहरावर झालेल्या अतिरेकी हल्यात धारातीर्थी धीर हेमंत करकरे,विजय साळसकर,अशोक कामटे,संदीप उन्नीकृष्णन् आणि क्रुर अतिरेकी कसाबला जिवंत पकडून देतांना स्वतःच्या छातीवर २० ते २५ गोळ्या झेलणाऱ्या शहीदवीर तुकाराम ओंबळे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
याच कार्यक्रमात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधान ग्रंथाची प्रस्ताविका दत्तात्रय एमेकर यांनी वाचतांना उपस्थित नागरीकांनी प्रस्ताविकेचे वाचन केले.या कार्यक्रमास पोलिस स्टेशन कंधारचे कर्तव्यदक्ष पी.आय ,ए.पी.आय .
विद्यमान जि.प.सदस्य अँड विजयजी धोंडगे,विद्यमान नगरसेवक,नगराध्यक्ष प्रतिनिधी,शहाजी अण्णा नळगे,शिवसेना निष्ठावंत गणेशभाऊ कुंटेवार, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजकुमार कोकाटे,गणेशराव मोरे पानशेवडीकर, सोशल मिडिया प्रमुख भोजुचीवाडीचे सरपंच सतिश देवकत्ते,गणेश मोरे, लेखनी बहाद्दर पत्रकार संपादक माधवराव भालेराव, सिकंदर भाई, प्रा.मुरलीधर थोटे,प्रा.सुभाषराव वाघमारे,एस.पी.केंद्रे,आदीसह सिध्दी विनायक मिलिट्री
कॅम्प मध्ये शिक्षण घेत असलेले भावी सैनिकांनी हजेरी लावून शहीदवीरांप्रती आपली संवेदना व्यक्त करत सहभाग ठळक वैशिष्ट्य होते.माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजीराव चुकलवाड, माजी सैनिक वाघमारे, माजी सैनिक कल्याणकर,माजी सैनिक शेख पानभोसीकर,सहित अनेक माजी सैनिक व देशप्रेमी नागरीक उपस्थित होते.देशभक्तीमय घोषणांनी ऐतिहासिक शिवाजी चौक दणाणून गेला.