आंबुलगा येथिल विशेष लसीकरण मोहीमेची विभागीय जिल्हाधिकारी शरद मंडलिक यांनी केली पाहणी

प्रतिनिधी गऊळ ता . कंधार ( शंकर तेलंग )


आंबुलगा येथे लसीकरणाचा आढावा घेताना प्राथमिक आरोग्य केंद्र पानशेवडी अंतर्गत उपकेंद्र आंबुलगा येथे विशेष लसीकरणाची मोहीम वैद्यकीय अधिकारी डॉ. फरनाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम 31 मार्च 2021 पासून सुरू करण्यात आली.

आज पर्यंत दि. 27 नोव्हेंबर 2021 रोजी आंबुलगा येथे 1600 लोकांची लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरण पूर्ण करण्यासाठी आपल्या कंधार येथील उपविभागीय जिल्हा अधिकारी शरद मंडलिक, व तहसीलदार संतोष कामठेकर साहेब, यांनी आंबुलगा मध्ये लसीकरणाची जनजागृती व लोकांना लसिकरण बद्दल. माहिती पोहोचण्याचे काम अधिकारी आपल्या गावी या मोहिमेतून लोकांना लसीकरनाचे महत्त्व पटवून आणि लोकांचा प्रतिसाद सुद्धा मिळाला.

लवकरच पूर्ण लसीकरण करून घ्यावा असं सांगून झालेल्या लसीकरणाचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले.


त्यावेळेस गावातील पोलीस पाटील गणेश फुलारी, उपसरपंच सचिन गुद्दे, तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यभान बिजलगावे, विश्वास वडजे, संभाजी वडजे, अनिल चालीकवार, इत्यादी उपस्थित होते. ही मोहीम राबवण्यासाठी डॉ. आकाश कुटे, आरोग्य सेविका ए.जी रनखांब, आरोग्य सेवक श्री काळे अंगणवाडी सुपरवायझर पोले मॅडम आशा वर्कर अंगणवाडी सेविका उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *