नांदेड : तालुक्यातील मरळक बुद्रुक येथील माजी सरपंच परशुराम देवराव शिंदे पाटील यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर ,डोळे तपासणी आणि चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मरळक बुद्रुक येथील महादेव मंदिर परिसरात सकाळी अकरा वाजता होणार आहे .
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री कमल किशोर कदम यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती आयोजक गणेश शिदे पाटील यांनी दिली आहे.
नांदेड जिल्ह्यातील तत्वनीष्ठ सरपंच म्हणून नावलौकिक मिळवणारे मरळक बुद्रुक येथील माजी सरपंच परशुराम देवराव शिंदे पाटील यांनी आयुष्यभर लोकसेवा केली. जनसेवेसाठी आयुष्य वेचलेल्या परशुराम पाटील शिंदे यांच्या यांच्या पुण्यतिथीनिमित्त कै. परशुराम पाटील शिंदे सेवा प्रतिष्ठान व तिरूमला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल क्रिटिकल केअर अँड ट्रॉमा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे .
या शिबिरास विशेष उपस्थिती म्हणून खासदार हेमंत पाटील आमदार, बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती राहणार आहे . या शिबिरात लायन्स नेत्रालया चे डॉक्टर ज्ञानेश्वर महाजन, यांच्यासह डॉक्टर गजानन पाटील रातोळीकर, डॉक्टर अभिजित कणसे, डॉक्टर सुनील खरबिकर, डॉक्टर अवधूत मोरे, डॉक्टर रमेश बोले ,डॉक्टर सुशांत चौधरी ,डॉक्टर सरिता शिंदे, डॉक्टर ज्योती येळणे बळवंते , डॉक्टर दत्ता मोरे ,डॉक्टर सुधाकर तहादे , डॉक्टर देवानंद पवार, डॉक्टर अनुप, डॉक्टर राजू राठोड, डॉक्टर राजेश कल्याणकर, डॉक्टर बालाजी मोरे हे विविध आजाराचे तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करून उपचार करणार आहेत अशी माहिती आयोजक तथा मराठा सेवा संघाचे आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील शिंदे यांनी दिली आहे .
या कार्यक्रमास डॉक्टर सुनील कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, संतोष गव्हाणे, बंडू भाऊ पावडे ,माधव पावडे, विठ्ठल पावडे, पंजाबराव काळे, उत्तमराव आलेगावकर, नारायण कदम, महेश खेडकर ,तातेराव शिंदे बालाजी शिंदे, बालाजी जाधव, दशरथ कपाटे, अनिल पाटील बोरगावकर ,जयंत कदम, बालाजी सूर्यवंशी, तातेराव पाटील आलेगावकर, संतोष क्षीरसागर, चंद्रकांत पवार ,देविदास सरोदे , शंकर पाटील कदम ,सत्यजित भोसले, अजित पवार ,रुपेश पावडे, गजानन कदम ,श्री राम कदम ,राहुल धुमाळ, प्रल्हाद जोगदंड, आनंद पावडे, शाम वडजे, शिवाजी शामराव पावडे, ओंकारसूर्यवंशी ,स्वप्नील सूर्यवांशी, नंदू जोगदंड , योगेश्वर शिंदे, गुणवंत तिडके, अमोल कदम , सुनील पवळे आदी उपस्थित राहणार असून परिसरातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक गणेश शिंदे पाटील यांनी केले आहे.