कंधार
नांदेड जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर व जिल्हा परिषदचे च्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौ .वर्षो ठाकुर यांनी लसिकरणास गती यावी म्हणून हर घर दस्तक लसिकरण मोहिम राबवली असुन कंधार शहरासह तालुक्यातील नागरिकांनी लसिकरण करून घेवून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे कंधार तालुकाध्यक्ष मिर्झा जमिर बेग यांनी दि.२७ नोव्हेबर रोजी कले आहे.
कंधार येथिल ग्रामिण रूग्णालयात वैघकीय अधिक्षक सुर्यकांत लोणीकर यांनी लसिकरणासाठी स्वतंञ्य पणे लसिकरण पथक स्थापन केली असून दररोज शहरातील वार्डातून घराघरी जावून लसिकरण केल्या जात आहे.
दि २७ नोव्हेबर रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या वतीने लसिकरणासाठी आवाहन करण्यात आले. पञकारसंघाचे जिल्हा सहसचिव दिगांबर वाघमारे , महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे कंधार तालुकाध्यक्ष मिर्झा जमिर बेग यांनी स्वतः लस घेवून नागरीकांनी लस घेण्याचे आवाहन केले.

यावेळी आरोग्य कर्मचारी याच्या सह पत्रकार एस.पी केंद्रे, हिंदवी बाणा संपादक माधव भालेराव , मंहमद सिंकदर आदी पत्रकारांची यावेळी उपस्थिती होती.