परभणी ; प्रतिनिधी
आज दिनांक 28 .11 .2021 रोजी आयोजित परभणी येथे बहुजन समाज राजकीय चेतना मेळावा आयोजित करण्यात आला . या मेळाव्याचे अध्यक्ष स्थान बालाजी गजले बहुजन भारत पार्टी राष्ट्रीय कोषाध्यक्ष यांनी भूषविले.
.या मेळाव्यामध्ये आदरणीय सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांचा महापरीनिर्वाण दिन , संविधान दिन व क्रांतिवीर लहुजी साळवे यांची जयंती या अशा विविध विषयावर व्याख्याने झाले आणि बहुजन शासक बनो या अभियानाअंतर्गत बहुजन भारत पार्टी च्या वतीने वक्ते म्हणून दिनेश ताकतोडे ,मारुती साठे व राजू कसाब यांनी व्याख्यान दिले
या कार्यक्रमाला परभणी मधील व इतर गावातील खेड्यापाड्यातून लोक कार्यक्रमाला उपस्थित होते.व बहुजन समाज राजकीय शासन व्यवस्थेपासून वंचित आहे त्या वंचित समाजाला शासन कर्ते बनवण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम केले बालाजी गजले यांनी अध्यक्षस्थानावरून या देशाचे खाजगीकरण करणाऱ्या सरकारला राज्य सरकार आणि केंद्र सरकारला बळकटी देऊ नका यासाठी आता पर्याय म्हणून आंबेडकरवादी विचाराचा पक्ष महामानवाचा सन्मान करण्यासाठी व बहुजनाचे खऱ्या अर्थाने सर्व प्रश्न सोडवण्यासाठी बहुजन भारत पार्टीला बळकट करा अशा प्रकारचे आव्हान बालाजी गजले यांनी अध्यक्षपदावरून उपस्थितांना संबोधित केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. सुनील कसबे यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश बारसे यांनी मानले या कार्यक्रमामध्ये बहुजन भारत पार्टी ची परभणी जिल्हा कार्यकारणी स्थापन करून कार्यकर्त्यांना पक्षाची पदे देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये बहुजन भारत पार्टीचे
जिल्हा प्रभारी म्हणून अॅड. सुनील कसबे 9420209146.
जिल्हाध्यक्ष दिनेश ताकतोडे9922865453 यांची निवड करण्यात आली.
परभणी शहराध्यक्ष पी. एल. कसाब9689679408.
युवा शहराध्यक्ष महेश बारसे8856962321 प्रसिद्धीप्रमुख राजू कर्डिले9657651002 मानकादेवी गावचे अध्यक्ष बालाजी गजले यांची निवड करण्यात आली हे सर्व निवड पत्र बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष बालाजी गजले यांनी निवड करुन सन्मानित केले.