कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील नवघरवाडी चे भुमिपुत्र मलीकार्जुन कारामुंगे व त्यांच्या भावानी गेल्या काही दिवसात पोलीस दलात सुमार कामगिरी केली आहे . मोस्ट वॉन्टेड आरोपींना पकडल्याने त्यांना पोलीस दलाकडून सुमारे दहा हजार रुपयाचा इनाम बक्षिस म्हणून मिळाले .नुकतेच मलीकार्जुन कारामुंगे यांची बढती होवून ते psi म्हणून निवड झाल्याने रविवार दि 28 नोव्हेबर रोजी मलीकार्जुन कारामुंगे यांचा नवघरवाडी ग्रामस्थानी सत्कार केला.
नवघरवाडी गावकरी मंडळी कडुन मलीकार्जुन कारामुंगे यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल तसेच त्यांचा छोटा भाऊ गुरुनाथ कारामुंगे याने Most wanted आरोपी 2 pistal सह पकडल्याबदल पोलीस खात्यांतर्गत त्याचा 10000 चे बक्षीस देवुन सत्कार करण्यात आलेला आहे

.
एवढे साहसाचे काम करून गावाचे नाव कमावलेल्या कारामुंगे भावांचा गावा तर्फे मारोती मंदिर नवघरवाडी येथे उत्साहात सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील नागरीकांची उपस्थिती होती

