एनसीसी प्रशिक्षण शिबिराचा श्री.शिवाजी कॉलेज,कंधार येथे समारोप

कंधारः श्री.शिवाजी कॉलेज,कंधार येथे एनसीसी च्या एटीसी कँपचे आयोजन करण्यात आले होते.समारोप कार्यक्रमात यशस्वी छात्रांना पदक व प्रमाणपत्र प्राचार्य डॉ. जी.आर.पगडे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
श्री.शिवाजी कॉलेज, कंधार येथे राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रशिक्षण शिबीर दि.२५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जी. आर. पगडे होते. कॅम्पचे समन्वयक प्रा.डॉ. दिलीप सावंत,नायब सुभेदार लाल मोहम्मद, हवालदार जगतराम ,देवेंंद्रसिंग, त्रिलोक यांची उपस्थिती होती.


प्रशिक्षण शिबिरात सीनियर कॅडेट फायरिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात विजेते शुभम केंद्रे( प्रथम) शेख असलम (द्वितीय ) देविदास मुसळे (तृतीय) तसेच सीनियर अंडर ऑफिसर म्हणून राहुल घुगे यांची निवड करण्यात आली.

बी कॅडेट फायरिंग स्पर्धेत अक्षय कोंडे ( प्रथम ) गणेश डफडे ( द्वितीय)ओमकार पांचाळ ( तृतीय )तसेच जूनियर अंडर ऑफिसर म्हणून गणेश डफडे ( प्रथम ) तर प्रतिक कांबळे ( द्वितीय) आले. सर्व विजेत्यांना पदक व पारितोषिके प्राचार्य डॉ. जी.आर. पगडे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. कार्यक्रमास प्रा. एस. पी. गुट्टे ,डॉ . पांचाळ, दत्तात्रय पेटकर ,शेख जाकेर ,शिवा उगले ,लक्ष्मण कळसकर आदीची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राहुल शिनगारपुतळे यांनी केले तर आभार ओमकार सूर्यवंशी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *