तूर उत्पन्नाची शेतकऱ्याची आशा मावळली
बदलत्या वातावरणाचा तुरीच्या पिकाला धोका
गऊळ प्रतिनिधी ; शंकर तेलंग
शेतकऱ्याला फार मोठं संकट आलेला आहे. मागील काही महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांना जवणाऱ्या प्रमुख पिकाचे नुकसान झाले. काही उभे पीक होते त्यांना धान्य फुटले. तर काही जाग्यावरच सडले यामुळे मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. आता शेतकऱ्यांच्या आलेल्या हातातले पीक ही मावळ आहे हे चित्र दिसत आहे.
सर्व शेतकरी हे आपल्या शेतातून उत्पादन पैसा मिळावा या आशेने शेतामध्ये काबाडकष्ट करत असतात. आणि पिकाचे उत्पन्न घेत असताना सोयाबीन, कापूस, ज्वारी आणि आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली जाते. अशा परिस्थितीमध्ये बदलत्या ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होणे. पिकावर कीड रोग प्रदू भावास पोषक वातावरण तयार झाले आहे.
त्यामुळे तुरीवर आळीचा पर दुवा प्रादुर्भाव झालेला आहे. फुल चट्टा सर्व काही नष्ट झालेला आहे.
त्यामुळे शेतकरी हा अडचणीत सापडलेला आहे. आता तुरीच्या आशेवर बसणारा शेतकरी त्यांना लागणारे रासायनिक औषधे चा वापर मोठ्या प्रमाणात खर्च आणि अपेक्षित उत्पन्न मिळत आहे त्यामुळे तो उदासीनता झालेला आहे.
आत्ताच दिलेल्या कंपनीचा विमा हा शेतकऱ्याला तुटपुंजा मिळालेला आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत आणि फक्त शेतकरी हा जगाचा पोशिंदा एवढा उरलेला हे चित्र आपल्याला पाहायला दिसत आहे. म्हणून शेतकऱ्यांचे तुरीच्या उत्पन्नावर नाराज चित्र दिसत आहे.
ढगाळ वातावरणामुळे मागील दोन-तीन दिवसापासून तुरीच्या उत्पादनाची आशा मावळली.