धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे )
स्थीर वातावरणास अस्थिर बनवणे म्हणजे प्रदुषण होय. आज सकाळी जो पाऊस झाला तो त्याच अस्थिर वातावरणाचा परिणाम होय. असे प्रतिपादन प्रा डॉ सिरसाट डी बी यांनी केले.
०२ डिसेंबर या प्रदुषण नियंत्रण दिवसाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ होळंबे टि एल होते. भौतिकशास्त्र विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात केले होते.
पुढे बोलताना त्यांनी प्रदुषणाचे मुख्य आणि उपमुख्य प्रकार सांगुन त्यावरील उपाययोजना सांगितल्या. ध्वनी प्रदूषणामुळे सुरुवातीला बहिरेपणा येतो, नंतर चिडचिडेपणा, राग येतो, रक्तदाब वाढतो आणि प्रसंगी ह्दयविकाराचा झटका पण येऊ शकतो. असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजक, भौतिक शास्त्र प्रमुख प्रा मुंडे एस जी यांनी प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन केले तर इतिहास विभाग प्रमुख प्रा चाटे एन एस यांनी आभार मानले.