डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त : स्ट्रॉंग गोल्ड ब्ल्यू फाउंडेशनच्या वतीने होणार कृतिशील अभिवादन



नांदेड : प्रज्ञासूर्य, बोधिसत्व ,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रवी राजीव भोकरे संचलित स्ट्रॉंग गोल्ड ब्ल्यू फाउंडेशनच्या वतीने दिनांक 6 डिसेंबर रोजी कृतिशील अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .

कृतिशील अभिवादन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध रॉकस्टार राहुल साठे आणि प्रख्यात गायक चेतन लोखंडे यांच्या भिम गीतांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .


विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गेल्या १४ वर्षापासून रवी राजीव भोकरे यांच्या वतीने विविध आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत .

या वर्षी स्ट्रॉंग गोल्ड ब्ल्यू फाउंडेशनच्या माध्यमातून कृतिशील अभिवादन करण्यात येणार आहे. यानिमित्त आ दिनांक सहा डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .

महाराष्ट्रातील प्रख्यात गायक रॉकस्टार राहुल साठे यांचा भीमराव वन मॅन शो हा गीत पुष्पांजली चा कार्यक्रम सायंकाळी चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आयोजित करण्यात आला आहे .सकाळी सहा वाजता महाराष्ट्रातील प्रख्यात गायक भीमाचं गाणं होईल वन्स मोर हा कार्यक्रम चेतन लोखंडे यांच्या वाणीतून साकारण्यात येणार आहे. शिवाय दिवसभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .


या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगारणी अंबुलगेकर यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी महापौर सौ. जयश्री निलेश पावडे ,शहीद जवान संभाजी कदम यांची विरपत्नी शितलताई कदम, शहीद वीर पत्नी विष्णूकांता संतोषराव सिद्धापुरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटणकर यांच्या हस्ते होणार आहे . विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाताई ठाकूर घुगे , जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे ,

महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, उपजिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी , निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सत्येंद्र वीरेंद्र अऊलवार, नांदेड जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार,

पोलिस उपाधीक्षक चंद्रशेखर देशमुख , पोलिस उपाधीक्षक सिद्धेश्वर भोरे आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांची विशेष उपस्थिती राहणार असून यावेळी पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार ,पोलीस निरीक्षक ननावरे ,पोलीस निरीक्षक अनिल काकडे , पोलीस निरीक्षक भगवान धबडगे , पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड ,अविरत प्रिंटिंगचे संचालक देवदत्त देशपांडे यांची उपस्थिती राहणार आहे.


आयोजित सर्व कार्यक्रमांना नांदेडकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले असून स्ट्रॉंग गोल्ड ब्ल्यू फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरीचा टी-शर्ट, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ , भारतीय राज्यघटनेची संविधान प्रास्ताविका ,प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे अशी माहिती संयोजक तथा स्ट्रॉंग गोल्ड ब्ल्यू फाऊंडेशनचे संचालक रवी भोकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *