ओबीसी पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संथा निवडणुकीत संधी – आ. अमरनाथ राजूरकर


नांदेड दि ५ ओबीसी पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संथा निवडणुकीत संधी देण्यात येईल असे आश्वासन काँग्रेसचे विधान परिषदेचे प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर यांनी दिले आहे.


नांदेड जिल्हा (शहर) काँग्रेस ओबीसी कमिटीची बैठक रविवारी (दि. पाच) सकाळी 11 वाजता मिनी सह्याद्री विश्रामगृहात ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष (शहर) विजय देवडे लहानकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेचे प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर बोलत होते.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री डी. पी. सावंत तर प्रमुख पाहुणे जि. प. चे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, माजी महापौर मोहिनी येवणकर , प्रदेश सरचिटणीस श्रावण रॅपणवाड ,काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राेहिदास जाधव , लक्ष्मण जाधव आदींची उपस्थिती होती.


यावेळी पुढे बोलताना आ. अमरनाथ राजूरकर म्हणाले की पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांना यापूर्वी ही पक्षाने संधी दिल्ली यावेळी महानगर पालिका व अन्य निवडणुकांतही ओबीसी पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

यावेळी माजी पालकमंत्री डी. पी. सावंत म्हणाले की ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाने नेहमीच प्रयत्न केले मात्र मोदी सरकारचे ओबीसी विरोधी धोरण आहे. काँग्रेसने सगळ्या जाती, समाजांना सोबत घेऊन विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिले असल्याचे ही ते म्हणाले.

प्रास्ताविक विजय देवडे ,सूत्रसंचलन शिवाजी पांगरेकर तर आभार युवक काँग्रेसचे महासचिव आदित्य देवडे यांनी मानले आहे उपस्तीत ओबीसी कार्यकर्ते सौ ललिता कुंभार सौ जयश्रीताई जयस्वाल सुनिल पांचाळ सौ अरुणाताई पुरी सौ पदमा झंपलवाड सदाशिव पुरी सखाराम तुप्पेकर श्याम कोकाटे दिपक पाटिल आंबादास रातोळे राहुल देशमुख गजानन सांवत

गोविंद तोरणे किरण पडलवार बालाजी घुमलवाड बालाजी आवडे काळेश्वर देवडे लक्ष्मण शिरोळे विजयकुमार घुमाडे विजय वादे रमेश देगावकर रमेश घुमलवाड बालाजी पाशावार संतोष कानघुले विठ्ठल पांगरेकर विजय राजे सुभाष तेलंगे विजय पांगरेकर सौ कविताताई राजे सौ छायाताई कानघुले सौ प्रियंकाताई देवडे विठ्ठल आचार्य सोनु आरेपलु बालाजी टिमकिकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *