“पीकणे ते विकणे” पर्यंतच्या सुविधा शेतकऱ्यांना पुरणार – आमदार शामसुंदर शिंदे यांचे प्रतिपादन

माळाकोळी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

माळाकोळी ; एकनाथ तिडके

लोहा विधानसभा मतदार संघाचा नव्याने मंजूर झालेले चोवीस जलसिंचन प्रकल्प व धोंड प्रकल्प या माध्यमातून शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध, 220 केव्ही सब स्टेशन च्या माध्यमातून शेतीसाठी अखंडित वीज पुरवठा, 1800 मेट्रिक टन साठवण क्षमता असलेल्या आठ गोडाऊन च्या माध्यमातून शेतीमाल साठवण्याची व्यवस्था, मजबूत व पक्क्या रस्त्याच्या माध्यमातून दळणवळण व बाजारपेठेपर्यंत शेतीमाल पोहोचवण्याची व्यवस्था अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून शेती पीक लागवड करणे पासून शेती मान बाजारपेठेपर्यंत विकण्यासाठी पोहोचवण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा “पिकणे ते विकणे ” पर्यंतच्या सर्व सुविधा लोहा कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना आपण पुरवणार आहोत यातील बऱ्याचशा प्रकल्पांची कामे सुरू आहेत तर काही प्रकल्प मंजुरीच्या उंबरठ्यावर असल्याचे प्रतिपादन आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दिले ते माळाकोळी येथे आयोजित विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते,

यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई शिंदे ,जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, युवा नेते विक्रांत शिंदे, सरपंच सौ वैष्णवी मोहन काका शूर, उपसरपंच निखिल मस्के, उपसभापती शाम अण्णा पवार,पंचायत समिती सदस्य सौ. गंगाबाई तिडके, सरपंच प्रतिनिधी मोहन काका शूर, जनार्धन तिडके, ग्रामपंचायत सदस्य केशवराव तिडके, अरुण सोनटक्के, चंद्रकांत केंद्रे, वैजनाथ केंद्रे, उल्हास राठोड ,परमेश्वर कांबळे,यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम 68 लक्ष रुपये निधीच्या माध्यमातून होत असलेल्या रस्ते व नाली बांधकाम कामाचा शुभारंभ आमदार शामसुंदर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.


यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले दीड हजार कोटी रुपयांचे सिंचन प्रकल्प मतदार संघात मंजूर झाले आहेत यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध होत आहे,220 केवी सबस्टेशन मतदारसंघात मंजूर झाले असून 25 एकर जागेत हा प्रकल्प उभा राहणार आहे जागेची पाहणी सुरू आहे,1800 मेट्रिक टन चे आठ गोडाऊन बांधकाम सुरू आहे, मतदारसंघातील रस्ते विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला आहे,

शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी आपण प्रयत्न करत असून महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी आपल्याकडे आराखडा तयार असून याबाबत लवकरच काम सुरू केले जाणार आहे यामुळे मतदार संघातील महिला आर्थिक सक्षम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. माळाकोळी येथील खंडोबा मंदिरपरिसर सुशोभीकरण व पाणी पुरवठा योजनेबाबत लवकरच निधी उपलब्ध केला जाणार असल्याचे ते म्हणाले.

आशाताई शिंदे
आमदार शामसुंदर शिंदे यांच्या प्रशासकीय अनुभवाचा फायदा येथील मतदार संघात होत असून मोठ्या प्रमाणावर विकास कामांबरोबरच येथील नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण प्रश्न सुटणार आहेत.

चंद्रसेन पाटील जिल्हा परिषद सदस्य
आमदार शामसुंदर शिंदे व आपल्या जिल्हा परिषद विकास निधीच्या माध्यमातून माळाकोळी सर्कल मध्ये दहा कोटी रुपयांपेक्षाही जास्त विकास कामांना सुरुवात झाली असून यामध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्मारक ,छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक, रस्ते विकास ,समाज मंदिर , पाणीपुरवठा योजना यां कामांचा समावेश आहे .


मोहन काका शूर सरपंच प्रतिनिधी
माळाकोळी ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामासाठी आमदार शामसुंदर शिंदे व जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पाटील यांच्या माध्यमातून दीड कोटी रुपयांपेक्षाही जास्त निधी उपलब्ध झाला असून यापुढेही त्यांच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करुन आजपर्यंत दुर्लक्षित असलेल्या माळाकोळी गावाचा विकास साधला जाणार आहे.


यावेळी घुगेवडी चे सरपंच पांडुरंग नागरगोजे , वंजारवाडी चे सरपंच परमेश्वर गीते कंधारेवाडी चे सरपंच गिरीश दिघोळे डोंगरगाव चे सरपंच दत्ता बागडे, रामतीर्थ चे सरपंच मोहन पोले, अश्टुर चे सरपंच दत्ता ससाने, माजी सरपंच व्यंकटराव तिडके, देवस्थान समितीचे अध्यक्ष सखाराम तिडके, गुरु सिंह बायास, डिगंबर भालेराव, बालाजी मस्के ,दौलतराव तिडके, राजू शिंदे संभाजी पवार , बाबूराव केंद्रे , प्रेम कुमार मस्के यांच्यासह नागरिक उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *