नांदेड ; प्रतिनिधी
कंधार नगरपालिका निवडणूक अवघ्या काहीच दिवसावर येऊन ठेपली असताना सर्वच राजकीय पक्ष थंड दिसत आहेत. निवडणूक वेळेवर होणार की लाबणार हा प्रश्न कायम असला तरी शिवसेनेने मात्र निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. कंधार येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत शिवसेना सर्व ताकदीनिशी निवडणूक लढणार असल्याची घोषणा अॕड.लोहा-कंधार शिवसेना युवा नेते मुक्तेश्वर धोंडगे व शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब कऱ्हाळे यांनी केली आहे
कंधार नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात दिनांक 6 नोव्हेंबर रोजी कंधार येथील शासकीय विश्रामगृहात उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब कऱ्हाळे व शिवसेना नेते ॲड.मुक्तेश्वर धोंडगे यांच्या प्रमुख उपस्थिती शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात झाली.
या बैठकीत कंधार नगर पालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली. या चर्चते 16 उमेदवाराच्या नावाची यादी करण्यात आले . महाराष्ट्र राज्यात महा विकास आघाडीचे सरकार असल्याने कंधार नगर पालिकेतही शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची महा विकास आघाडी असेल असे जाहीर करण्यात आले. काँग्रेस पक्षानेही शिवसेनेला सन्मानाची वागणूक देऊन शिवसेनेला दहा जागा देण्यात याव्या अशीही चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीत बोलताना अॕड मुक्तेश्वर धोंडगे म्हणाले की, मी शिवसेनेसोबतच असून येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत शंभर टक्के वेळ देणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. तर शिवसेना ची पूर्ण ताकदीनिशी कंधार नगरपालिका निवडणूक लढणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब कराळे यांनी दिली
या बैठकीला माजी नगरसेवक गणेश कुंटेवार नगारसेवक,अरुण बोधनकर ,बाळू लुंगारे, पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण ,माजी सभापती पंडितराव देवकांबळे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते