एकच मिशन – जुनी पेन्शन..

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

नांदेड येथून सुरुवात झालेल्या सायकल पेन्शन संघर्ष यात्रेचे फुलवळ जल्लोषात स्वागत.

१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता सर्व विभागातील कर्मचारी संघटनांच्या समन्वय पेन्शन संघर्ष समिती यांच्या वतीने ता. २१ डिसेंबर २०२१ पासून कल्याण ते विधान भवन मुंबई पर्यंत भव्य आणि दिव्य असा पेन्शन मार्च निघणार आहे.

या पेन्शन मार्च ची सुरुवात नांदेड जिल्ह्यातून आज ता. १५ डिसेंबर पासून झाली . नांदेड जिल्ह्यातील पेंशन फायटर तुकाराम रेणुगुंठवार सर विद्याविकास हायस्कूल बाऱ्हाळी ता. मुखेड हे एकूण सहाशे पन्नास किलोमीटर चे अंतर सायकलने प्रवास करून पेन्शन बाबत जाणीव जागृती करण्याचं काम करणार आहेत.

   या सायकल मार्च ला नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांचे प्रतिनिधी श्री सुरेशराव आंबुलगेकर साहेब, तसेच विजयाताई देशपांडे यांच्या हस्ते तसेच सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले आहे. 

या पेन्शन संघर्ष सायकल रॅली चे फुलवळ येथे स्वागत करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या , यावेळी श्री बसवेश्वर विद्यालय फुलवळ चे मुख्याध्यापक बी एन मंगनाळे , सह शिक्षक सी एम फुलवळकर , एस एस नामवाडे , बी एन साके , ए एस गुंडरे , जी एन करेवार , जी एम कोठेवाड , जे व्ही मंगनाळे , एम बी  पांचाळ , मुनेश शिरशिकर , व्ही टी साबळे , एस एम डांगे मॅडम , डी पी नवघरे मॅडम हे सर्व उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एस नामवाडे यांनी केले तर एम बी पांचाळ यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *