लोहा ; प्रतिनिधी
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने दिलेल्या हाकेनुसार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा लोहाच्या वतीने जुनी पेन्शन सह शिक्षकांच्या इतर मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
अखिल शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील मारतळेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात आंदोलन कर्त्यांनी ‘एकाच मिशन जूनी पेन्शन’ या घोषणेनी तहसिल परिसर दणाणून सोडला. तालुकाध्यक्ष मंगल सोनकांबळे यांनी उपस्थितांना अंनदोलनाची भूमिका स्पष्ट केली.
या आंदोलनास लोहा पं.स. चे सभापती आनंदराव शिंदे, उपसभापती नरेंद्र गायकवाड नगरसेवक छत्रपती धुतमल, नगरसेवक दत्ता वाले किसान आघाडीचे बाबाराव गवते
यांच्यासह विविध शिक्षक सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत पाठींबा दिला.
यावेळी आंदोलन कर्त्यांनी तहसिलदारा मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले या निवेदनात पुढील प्रश्नांवर शासन प्रशासनाचे लक्ष वेधून ते सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.
१)जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
२) शिक्षण सेवक पद्धत बंद करून,नियमित शिक्षकाची नेमणूक करावी तसेच कार्यरत शिक्षणसेवकांचे मानधन वाढवण्यात यावे .
३) नव्या शैक्षणिक धोरणातील शिक्षण व शिक्षक विरोधी तरतुदी वगळण्यात याव्यात.
(शाळा समुह योजना,स्वयंसेवक नेमणे, पुर्व प्राथमिक शिक्षणासाठी अप्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक)
४) सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन ,खंड दोन प्रकाशित करण्यात यावा.
५)जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी.
६)शिक्षकांना १०,२०,३० वर्षानंतरची आश्वासित प्रगती योजना लागू करावी.
७) संगणक परीक्षा उत्तीर्णतेला मुदतवाढ देण्यात यावी व वसुली थांबवण्यात यावी.
८)पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी देण्यात यावी.
९)शिक्षकांना रजारोखीकरणाचा लाभ देण्यात यावा.
१०)वस्तीशाळा शिक्षकांची मुळनियुक्ती पासून सेवा धरुन वरीष्ठश्रेणीचा लाभ द्यावा.
११) शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी.
१२) केंद्रप्रमुखांची१००% पदे पदोन्नतीने शिक्षकांतून भरण्यात यावी.
१३)निवासाची व्यवस्था होत नाही तो पर्यंत मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी
तालुका स्तरीय मागण्या
१४) वारंवार मागणी करूनही न मिळणारा लोहा तालुक्यातील डी.सी.पी.एस धारकांच्या कपातीचा हिशोब देण्यात यावा.
१५) सहाव्या वेतन आयोगातील पाचवा हप्ता, व सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता जमा करणे.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, तालुकाध्यक्ष मंगल सोनकांबळे, जिल्हा पदाधिकारी गंगाधर नंदेवाड, शेख मुर्तूज, रमेश पवार, तालुका सरचिटणीस अंगद सुर्यवंशी, तालुकानेते एम.डी. सिरसाट तालुका कर्याध्यक्ष रुस्तुम राठोड,उपाध्यक्ष राव साहेब जाधव,संघटक माधव गुरमे,रूस्तूम राठोड,
जुनी पेन्शन संघटनेचे गणपती बोथीकर , देविदास बालाघाटे,ओंकार बोधनकर,देवासिंह बयास,संतोष जोशी,चिंचोरे,आरोग्य संघटनेचे जोंधळे,सुधाकर भडादे, शिवाजी काळे, शिवाजी पांडूर्णे
आदींसह अनेकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.