लोहा:(प्रतिनिधी)
अखिल म.प्रा.शिक्षक संघटनेच्या वतीने १नोव्हेंबर२००५नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी अखिल म.प्रा.शि.संघाच्या वतीने उद्या दि.१४/१२/२०२१ रोज मंगळवारी दु.१२ते ०४दरम्यान तहसील कार्यालय समोरील गेटजवळ धरणे आंदोलन जि.अध्यक्ष अशोक पाटील मारतळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार कळविण्यात आले आहे की, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ता.शाखा लोह्याच्या वतीने कोव्हिड नियमांचे पालन करुन, लोकशाही मार्गाने हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे .
तरी लोहा तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय ,खाजगी शाळा शिक्षक ,व सर्व शासकीय विभागाच्या कार्यालयाचे डीसीपीएस धारक कर्मचारी व शिक्षक बंधू भगिनी यांनी अंदोलनात सहभागी होऊन यशस्वीतेसाठी सहकार्य करावे,असे आवाहन अखिल म.प्रा.शि.संघाचे जि.अध्यक्ष अशोक पाटील मारतळेकर, जि.उपाध्यक्ष मूर्तूज शेख, शिवराज सोनवळे, रमेश पवार ता.अध्यक्ष मंगल सोनकांबळे, ता.सरचिटणीस अगंद सुर्यवंशी, ता.कार्याध्यक्ष रूस्तूम राठोड, वरिष्ठ उपा.जगन काळे,बी.एन.जंगापल्ले, बुद्रुक, शेळके,शिरगिरे,बी.एन.नरवाडे,अंअंबादास पवार आदींनी केले आहे.