उस्माननगर बीटातील ऑनलाइन शैक्षणिक उपक्रमाची जिल्ह्यात चर्चा

 


कंधार ; 


कोरोना काळात मिशन शिष्यवृत्ती हा ऑनलाइन शैक्षणिक उपक्रम पं.स.कंधार अंतर्गत बीट-उस्माननगर चे शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांच्या संकल्पनेतून कोरोना काळात ग्रामीण भागातील इ. ५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी मिशन शिष्यवृत्ती अभिनव शैक्षणिक उपक्रमाची १ जुलै २०२० पासून नियमित राबविण्यात येत आहे.


         सध्या कोरोनामुळे सर्वत्र शाळा बंद आहेत ,त्यामुळे ग्रामीण भागात शैक्षणिक वातावरण टिकवून ठेवण्यासाठी शाळा बंद पण शिक्षण चालू या विचारातून या उपक्रमाची निर्मिती केलेली आहे,यात ऑनलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व नवोदय चे अध्यापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

बीट-उस्माननगर अंतर्गत उस्माननगर,शिराढोण,चिखली हे तीन केंद्र समाविष्ट होतात.या उपक्रमात तिन्ही केंद्रातील 13 निवडक शिक्षकांना घेऊन भाषा,गणित ,इंग्रजी व बुद्धिमत्ता या विषयाचे ऑनलाइनपद्धतीने दररोज अध्यापन सुरू केलेले आहे.http://yugsakshilive.in/?p=1684


त्यासाठी मा.मेटकर साहेबांनी पुर्वनियोजन करून विषय ,वार,घटक व शिकविणारे शिक्षक यांची नियुक्ती केलेली आहे.ठरवून दिलेल्या वेळी स.८.०० पुर्वी मिशन शिष्यवृत्ती/नवोदय या व्हाटसअप ग्रुपवर संबंधित घटकांशी निगडीत व्हिडीओ,पीडीएफ,सराव प्रश्न पाठवले जातात.

विद्यार्थी त्यांच्या सहाय्याने वेळ मिळेल तेव्हा दिवसभर अभ्यास करतात सायंकाळी ५.०० वा. ग्रुपवर ऑनलाइन चाचणीची लिंक पाठविली जाते सदरील चाचणी सायं. ५ ते ९ या वेळात घेतली जाते व रात्री ९.०० वा.चाचणीत पैकी गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव घोषित केले जाते.

त्यामुळे स्पर्धेचे वातावरण तयार होऊन विद्यार्थी आवडीने चाचणी सोडवित आहेत.असा हा कोरोना काळात मिशन शिष्यवृत्ती हा ऑनलाइन अभिनव उपक्रम चालू असून त्यात बीटमधील 122 विद्यार्थ्यांचे पालक उपक्रमाशी जोडले आहेत.

त्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पालक सुद्धा या उपक्रमाशी जोडले गेलेले आहेत.आपला पाल्य  ऑनलाइन शिक्षण घेत असल्याचे समाधान पालकांनाही होत आहे.http://yugsakshilive.in/?p=1684


            या अभिनव उपक्रमाची दखल प्रशासनाने घेतली असून संपूर्ण जिल्हाभर हा उपक्रम सुरू करण्यासाठी मा.दिग्रसकर साहेब प्रयत्नशील आहेत,कोरोना काळात *मिशन शिष्यवृत्ती* या अभिनव ऑनलाइन शैक्षणिक उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करत असल्याबद्दल मा.वसंत मेटकर (शि.वि.अ.) बीट-उस्माननगर यांचे सर्व  स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

या उपक्रमासाठी बुद्धिमत्ता विषयासाठी एकनाथ केंद्रे , सोनकांबळे व पल्लवी नरंगले मॉडमतर गणित विषयासाठी कारामुंगे सर ,पाटील सर ,मुखेडे सर तर मराठी विषयासाठी विश्वकर्मा सर ,सुर्यवंशी सर,चक्रावार सर आणी इंग्रजी विषयासाठी  नागलगावे सर,पांचाळ सर,शिंदे सर हे परिश्रम घेत आहेत आणी चाचणी निर्मितीसाठी विनोद मोरे हे काम पहात आहेत.


   हा उपक्रम यशस्वीते साठी सौ.हुडवेकर एस.पी.केंद्र प्रमुख, श्री ढोणे व्ही पी कें.प्र. श्री जयवंत काळे सर कें.मु.अ. व अनिरुद्ध शिरसाळकर सर हे काम पहात होती हेत.


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना/पालकांना ऑनलाइन माध्यमातून एकञित करून हा उपक्रम राबविण्यासाठी सौ.लक्ष्मीबाई घोरबांड सभापती,उपसभापती,सर्व पं.स.सदस्य ,सर्व शा.व्य.स.अध्यक्ष व सदस्य,केंद्रप्रमुख व कें.मु.अ.यांचे सहकार्य लाभले आहे.http://yugsakshilive.in/?p=1684


            हा अभिनव उपक्रम यशस्वी रित्या चालू राबवित असल्याबद्दल *मिशन शिष्यवृत्ती* टीमचे अभिनंदन मा.प्रशांत दिग्रसकर(शिक्षणाधिकारी)जि.प.नांदेड ,पं.स.कंधार येथील गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांनी केले आहे. http://yugsakshilive.in/?p=1684

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *