लोहा-कंधार तालुक्यात नवीन २४ साठवण तलावासाठी अठराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर ;
आमदार श्यामसुंदर शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती
कंधार प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे गोगदरी, पळसवाडी, कंधारेवाडी व लोहा तालुक्यातील रामाची वाडी या गावातील साठवण तलावासाठी या भागातील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली होती पण संपादित जमिनीचा मावेजा बऱ्याच वर्षांपासून अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नव्हता, शेतकऱ्यांना मावेजा मिळावा म्हणून लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी मंत्रालय स्तरावर वेळोवेळी तळमळीने पाठपुरावा करून भू संपादित झालेल्या शेतकऱ्यांना शासन स्तरावरून सहा कोटी रुपयाचा मावेजा ला मंजुरी मिळवून आणली आहे,
कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी कंधार येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. लोहा व कंधार तालुक्यातील नवीन 24 साठवण तलावासाठी अंदाजित १८०० कोटी रुपयाचा शासकीय निधी मंजूर करुन घेतला असून लोहा तालुक्यातील हिंदोळा- डोलारा साठवण तलाव ३९३ कोटी रुपये, गुंडा उमरा २६२ कोटी, हिंदोळा ६५.५ कोटी ,मलकापूर ६५.५ कोटी, दहिकळंबा ३९.३ कोटी, सावरगाव नसरत६५.५ कोटी, जानापुरी ६५.५ कोटी, शेलगाव धानोरा १५७.२ कोटी, मडकी निळा ३७.२० कोटी, करमाळा १३.१ कोटी, पिंपळदरी ६.५५ कोटी, कापसी १३.१ कोटी, जोमेगाव ६.५५ कोटी,येळी १३.१ कोटी, नांदगाव २६.२ कोटी, मारतळा १३.१ कोटी, नगारवाडी १३.१ कोटी, देऊळगाव २६.२ कोटी, काम जळगा वाडी २६.२ कोटी, करमाळा १३.१कोटी व कंधार तालुक्यातील सावळेश्वर साठवण तलाव ६५.५ कोटी, लाट खुर्द ५२.४ कोटी, परशुराम तांडा 13.1 कोटी हळदा १३.१ कोटी अशा मतदार संघातील 24 नवीन साठवण तलावासाठी शासनाने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला असल्याचे आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
लोहा-कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मतदारसंघात शेतीपूरक उद्योगधंदे येणाऱ्या काळात सुरू करण्यासाठी मी कटिबद्ध असून साठवण तलावाची कामे येणाऱ्या तीन वर्षाच्या काळात कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार असल्याचे आमदार शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले,